Solapur News : 'राम सातपुतेंचे स्टेट्‌स का ठेवले?'; आमदार समर्थकाला नातेपुत्यात मारहाण, सहा जणांवर गुन्हा दाखल

Assembly Election 2024 : ‘संबंधित आरोपींना पोलिस जोपर्यंत अटक करत नाहीत, तोपर्यंत पोलिस ठाण्यासमोरून हटणार नाही ,’ अशी भूमिका आमदार सातपुते यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी घेऊन नातेपुते पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला होता. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर सातपुते यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
Uttam Jankar-Ram satpute
Uttam Jankar-Ram satputeSarkarnama
Published on
Updated on

Natepute, 18 November : भारतीय जनता पक्षाचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांचे ‘स्टेट्‌स मोबाईलमध्ये का ठेवले’ अशी विचारणा करत माळशिरस तालुक्याच्या नातेपुते येथील लक्ष्मण मगर यांना मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे उमेदवार उत्तम जानकर यांचे समर्थक प्रेम देवकाते आणि इतरांनी केली असून पोलिसांनी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

‘संबंधित आरोपींना पोलिस जोपर्यंत अटक करत नाहीत, तोपर्यंत पोलिस ठाण्यासमोरून हटणार नाही ,’ अशी भूमिका आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी घेऊन नातेपुते पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला होता. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर सातपुते यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.

दरम्यान, मारहाण प्रकरणी प्रेम देवकाते, गोटम पांढरे, अक्षय ठोंबरे, अजित पांढरे, व इतर दोन अनोळखी व्यक्ती अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अटकेच्या मागणीसाठी आमदार सातपुते यांनी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले होते.

माळशिरस विधानसभा मतदारसंघात (Malshiras Assembly Constituency) महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांना महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर हे निवडणूक लढवत आहेत. माळशिरसमध्ये एकतर्फी वाटणारी निवडणूक शेवटच्या टप्प्यात रंगतदार झाली आहे. त्यात या वादाची भर पडली आहे.

Uttam Jankar-Ram satpute
Madha Constituency : बबनदादांच्या मुलाला पाठिंबा दिल्याने पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्षांची हकालपट्टी!

यासंदर्भात लक्ष्मण मगर यांनी माहिती दिली की, नातेपुते येथील अण्णाभाऊ साठे चौकात दुपारी दोनच्या सुमारास रणजित काळे यांच्याशी बोलत उभा होतो. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या प्रेम देवकाते व इतर सहकाऱ्यांनी माझ्यासोबत वाद घातला. तुमची गावात किती घरे आहेत. तुला लय मस्ती आली आहे, अशी विचारणा करत गचांडी पकडून शिवीगाळ करत मला मारहाण करण्यात आली. मला न्याय मिळावा, अशी मागणी मगर यांनी केली.

शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रकार आज लक्ष्मण मगर यांच्याबाबत झाला आहे. हे सर्व माळशिरस तालुक्यात होणार आहे. पण कोणीही घाबरू नये; कारण लक्ष्मण मगर एकटे नाहीत, त्यांच्या पाठीशी संपूर्ण तालुका आहे. पोलिसांनीही आरोपीला पाठीशी न घालता तातडीने अटक करावी, अशी मागणी आमदार राम सातपुते यांनी केली.

नातेपुत्याचे सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी, उमेदवार आमदार राम सातपुते यांना मी संबंधित आरोपीस लवकरच अटक करण्यात येईल, त्यासाठी पोलिस पथक पाठवले आहे, असे सांगितले. मात्र, सातपुते हे ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. मात्र, वरिष्ठ पोलिसांच्या विनंतीनंतर आमदार सातपुते यांनी आंदोलन मागे घेतले.

Uttam Jankar-Ram satpute
Mohol Constituency : मोहोळच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; तगड्या अपक्षाचा शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा

ठिय्या आंदोलनात के. के. पाटील, शरद मोरे, रिपब्लिकन पक्षाचे मिलिंद सरतापे, रमेश पाटील, अप्पासाहेब देशमुख, ॲड. भानुदास राऊत, शिवराज पुकळे, सतीश सपकाळ, हणमंतराव सुळ, दादासाहेब उराडे, बाजीराव काटकर व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com