Solapur, 18 November : मोहोळ विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या अखेर दिवशी शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. क्षीरसागर यांच्या निर्णयामुळे खरे यांचे बळ वाढताना दिसून येत असून महायुतीचे उमेदवार आमदार यशवंत माने यांच्यापुढील अडचणी वाढताना दिसत आहे.
अखेरच्या दोन दिवसांत माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने काय खेळी करतात आणि महाविकास आघाडीतील नेते ती कशी उलटवून लावतात, यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. मात्र, संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांच्या निर्णयामुळे मोहोळच्या निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून (Mohol Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून संजय क्षीरसागर हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू खरे यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे संजय क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. याशिवाय त्यांनी आपला प्रचारही जोमात केला होता, त्यामुळे मोहोळमधील तिरंगी लढतीत कोणाचा फायदा होणार, याची चर्चा चालू असतानाच आज मोहोळच्या राजकारणात प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
मोहोळच्या निकालाची उत्सुकता ताणली गेली असतानाच आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणी अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे मोहोळच्या राजकारणात खरे यांचे पारडे काहीसे जड होताना दिसत आहे. प्रत्यक्ष मतदानात याचा किती फायदा होतो, हे प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
मोहोळमध्ये आता एकास एक लढत
मोहोळच्या निवडणुकीत आता खरी रंगत आली आहे. कारण मतदारसंघात आता एकास एक लढत होणार आहे. मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने पहिल्या दिवसापासून विधानसभा निवडणुकीत एकास एक लढत देण्याचा प्रयत्न होता. तो अखेरच्या दिवशी यशस्वी झाला आहे. आता महायुतीचे उमेदवार आमदार यशवंत माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.