Madha Constituency : बबनदादांच्या मुलाला पाठिंबा दिल्याने पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्षांची हकालपट्टी!

NCP SP District President removed for backing Babandada son: पंढरपूर तालुक्यातील 42 गावे ही माढा विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेली आहेत, त्यामुळे माढ्यात पंढरपूरच्या नेत्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरते.
Ganesh Patil
Ganesh PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 November : माढा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार रणजितसिंह बबनराव शिंदे यांना पाठिंबा दिल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील हे उमेदवार आहेत, त्यानंतरही पाटील यांनी रणजित शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) यांनी या वेळी निवडणुकीतून माघार घेत मुलगा रणजित शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न केले. उमेदवार अर्ज भरण्याच्या शेवटच्या तासापर्यंत बबनदादांनी मुलाला तुतारीची उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा केली. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP SharadChandra Pawar party) माढ्यातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी काल माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे सभाही घेतली आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव, अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

गणेश पाटील यांनी रणजितसिंह शिंदे यांना पाठिंबा देण्याचे कारण पंढरपूर तालुक्यातील राजकारण आहे. पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अभिजीत पाटील यांनी युवराज पाटील, गणेश पाटील, भगीरथ भालके आणि कल्याणराव काळे यांच्या विरोधात निवडणूक लढवून जिंकली.

Ganesh Patil
Mohol Constituency : मोहोळच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; तगड्या अपक्षाचा शरद पवारांच्या उमेदवाराला पाठिंबा

अभिजीत पाटील हे तालुक्यातील विरोधक असल्याने विठ्ठल परिवारातील नेते असलेल्या गणेश पाटील यांनी अभिजीत पाटील यांना पाठिंबा देण्याच्या ऐवजी रणजित शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपूर तालुक्यातील ४२ गावे ही माढा विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे माढ्यात पंढरपूरच्या नेत्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरते.

दरम्यान, आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलाला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सोलापूर जिल्ह्याचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांची पदासह पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात निर्णय घेतल्याचे कारण त्यांना हकालपट्टी करताना देण्यात आलेले आहे.

Ganesh Patil
Pandharpur Constituency : महाविकास आघाडीतील दोन खासदारांनी पंढरपूरची लढाई केली प्रतिष्ठेची!

कोण आहेत गणेश पाटील?

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती (स्व) राजूबापू पाटील यांचे चिरंजीव अशी गणेश पाटील यांची ओळख आहे. राजूबापू पाटील हे शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष होते. कोरोना काळात राजूबापू पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव गणेश पाटील यांना पक्षाने युवक जिल्हाध्यक्षपदावर संधी दिली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com