Madha Loksabha : मोहोळच्या बारसकरांना माढ्यातून लढायचंय राष्ट्रवादीच्या तिकिटावर...

NCP Review Meeting : ज्येष्ठ नेते शरद पवार हे बुद्धिबळातील राजे आहेत. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे राजाने उभे राहिले पाहिजे.
Ramesh Baraskar
Ramesh BaraskarSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघनिहाय आढावा घेतला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदारसंघाचा बुधवारी (ता. १९ ऑक्टोबर) सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील मातब्बरांच्या उपस्थितीत घेण्यात आला. त्यात मोहोळचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी माढ्यातून उमेदवारी मागितली आहे. आता पक्ष काय निर्णय घेतो, याकडे मोहोळचे लक्ष लागले आहे. (Ramesh Baraskar sought nomination from NCP from Madha Lok Sabha Constituency)

शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या वाट्याला येणाऱ्या संभाव्य मतदारसंघाची चाचपणी सुरू केली आहे. मतदारसंघातील ताकद, इच्छूक उमेदवार आणि राजकीय परिस्थिती याचा आढावा घेतला जात आहे. अनेक इच्छूक आपल्या गॉडफादरच्या माध्यमातून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावताना दिसत आहेत. त्यातही शरद पवारांनी निवडणूक लढविलेला माढा मतदारसंघ देशभरात विशेष चर्चिला जातो. त्याच माढ्यातून मोहोळ्याची बारसकरांनी उमेदवारी मागितल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ramesh Baraskar
Shinde Group News : मुख्यमंत्री महोदय, ठाकरेंना सोडा; शिवसेना बांधणीकडे लक्ष द्या...!

माढा मतदारसंघात माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला, माण-खटाव, फलटण या मतदारसंघाचा समावेश असून एकूण ८४१ गावे या मतदारसंघात येतात. माढा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत चर्चा झाली. त्या बैठकीत आपण पक्षश्रेष्ठींकडे माढ्यातून उमेदवार देण्याची मागणी केली आहे. या मतदारसंघात मराठा, धनगर यांच्यापाठोपाठ अडीच लाख माळी समाज आहे. ओबीसींची मोठी ताकद या मतदारसंघात आहे, त्यामुळे आपण या मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी शरद पवारांकडे केली आहे, असेही रमेश बारसकर यांनी सांगितले.

बारसकर म्हणाले की, मागील निवडणूक भारतीय जनता पक्षाने जनतेच्या जिवावर लढवली आहे. आता मात्र, मतदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्या पाठिंब्यावर आम्हाला ही निवडणूक लढवायची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षनिरीक्षक राहिल्यामुळे माझा या मतदारसंघातील अनेकांशी संपर्क आहे. मोहोळ तालुक्यातील जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून दैनंदिन संपर्क आहे.

Ramesh Baraskar
Sharad Pawar Big Decision : माढा लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवारांचा मोठा निर्णय

ज्येष्ठ नेते शरद पवार हे बुद्धिबळातील राजे आहेत. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मागे राजाने उभे राहिले पाहिजे. माढा मतदारसंघातून मला लोकसभेसाठी संधी दिली, तर भूमिपुत्राला संधी दिल्यासारखे होईल. सध्या सर्वत्र जातीचे राजकारण सुरू आहे, हे सर्वश्रुत आहे. अशा वेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माढ्यातून संधी मिळाल्यास एक सकारात्मक मेसेज समाजात जाऊ शकतो, असेही बारसकर यांनी म्हटले आहे.

Ramesh Baraskar
MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्टाच्या तंबीनंतर नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणावर बोलणे टाळले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com