MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्टाच्या तंबीनंतर नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणावर बोलणे टाळले

Rahul Narwekar News : ठीक आहे, हा न्यायालयीन विषय आहे. आपण बघू, असे उत्तर नार्वेकरांनी दिले.
MLA Disqualification Case
MLA Disqualification CaseSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News : सर्वोच्च न्यायालयाने तंबी दिल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी आज (ता. १९ ऑक्टोबर) माध्यमांशी बोलताना शिवसेना आमदार अपात्रतेबाबत भाष्य न करता तो न्यायप्रविष्ट विषय आहे, असे सांगून अधिक बोलणे टाळले. (After Supreme Court's advice, Narwekar refrained from speaking on MLA disqualification case)

विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर हे आज चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी प्रसिद्ध महाकाली देवीची विधिवत पूजा करून दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासोबत आमदार किशोर जोरगेवार होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांना आमदार अपात्रता प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला, त्या वेळी त्यांनी त्या विषयावर बोलणे टाळले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

MLA Disqualification Case
Nilanga Politics News : सरकार आपले तरी लातूरला पाणी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही; निलंगेकरांनी रणशिंग फुंकले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या भेटीसंदर्भातही नार्वेकर यांनी बोलणे टाळले. ते म्हणाले की, आज आम्ही महाकाली देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने आणि सर्व प्रतिनिधींनी हा सुंदर महोत्सव आयोजित केलेला आहे, त्यात सहभागी होण्यासाठी आम्ही आलो आहोत. महाराष्ट्रातील जनतेला सुख, समृद्धी आणि समाधान प्राप्त होवो. आमच्या बळीराजाला सुखाचे दिवस यावेत. तसेच, राज्यातील जनतेला योग्य न्याय मिळवून देण्याची सद्‌बुद्धी मला लाभो, अशी मी महाकाली देवीच्या चरणी प्रार्थना केली आहे.

आमदार अपात्रतेचा विषय हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे, त्यावर चर्चा करणे योग्य होणार नाही. योग्य वेळी त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल आणि तो तुम्हाला सांगण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्षांनी नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे, त्याबाबतही नार्वेकर यांनी बोलणे टाळत ठीक आहे, न्यायालयीन विषय आहे. आपण बघू, असे उत्तर दिले.

MLA Disqualification Case
Eknath Khadse News : एकनाथ खडसे कुटुंबीयांना तब्बल १३७ कोटींचा दंड?

कोर्टाने काय म्हटले होते?

विधानसभा अध्यक्षांनी मीडियाशी कमी बोलावे आणि काम लवकर करावे, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावणीदरम्यान दिली होती.

MLA Disqualification Case
Pasha Patel News : धनंजय मुंडेंकडून गुरुदक्षिणा : बोलून दाखवलं ते करून दाखवलं ! कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com