Ramesh Kadam News : रमेश कदम पुन्हा विधानसभेच्या मैदानात; पण पक्ष गुलदस्तात?

Mohol Election : रमेश कदम यांची युवा वर्गात आणि मागासवर्गीय मतदारांमध्ये मोठी क्रेझ आहे.
Ramesh Kadam
Ramesh KadamSarkarnama
Published on
Updated on

Solapur : तब्बल आठ वर्षांनंतर मोहोळ मतदारसंघात आलेल्या माजी आमदार रमेश कदम यांनी विधानसभेची आगामी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यांनी मतदारसंघाचा दौरा करताना कोणालाही दुखावले नाही, त्यामुळे रमेश कदम नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार याची उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांसह मतदारसंघाला लागली आहे. (Ramesh Kadam again in the assembly ground; But the party bouquet?)

राष्ट्रवादी पक्षातून आमदार झाल्यानंतर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ गैरव्यवहारप्रकरणी कारागृहात असलेले रमेश कदम यांची आठ वर्षांनंतर सुटका झाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी रमेश कदम यांचे मोहोळ येथे जंगी स्वागत केले. रमेश कदम पुन्हा एकदा मोहोळ मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र, कोणत्या पक्षाकडून लढणार याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात विद्यमान आमदार यशवंत माने यांचे तिकीट कापून उमेदवार बदलणे कितपत सोयीचे ठरेल, हे सांगता येणार नाही. तसेच शरद पवार गटाकडे सध्या मोहोळ मतदारसंघात तोडीस तोड उमेदवार नाही. त्यातच राजन पाटील गटानेही साथ सोडली आहे, त्यामुळे रमेश कदम यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळविणे सोयीचे होऊ शकते.

Ramesh Kadam
MNS Agitation : राज यांच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक; मुलुंड, पनवेल, ऐरोली, बीडमधून टोल न घेता वाहने सोडली

रमेश कदम यांची युवा वर्गात आणि मागासवर्गीय मतदारांमध्ये मोठी क्रेझ आहे. दुसरीकडे कदम हे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, महाविकास आघाडीने एकच उमेदवार दिल्यास इथे रमेश कदम यांना लॉटरी लागू शकते. एकंदरीत सध्या तरी रमेश कदम कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे अद्याप अस्पष्टच आहे.

बहुरंगी लढतीची शक्यता?

राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षफुटीमुळे राजकारणाची गणिते बदलली आहेत. जर महाविकास आघाडी आणि शिंदे-पवार-भाजप युतीमध्ये मोहोळ मतदारसंघ कोणत्या पक्षाला मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र, सर्वच गट आणि पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास मोहोळमध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळू शकते. या ठिकाणी भाजपकडून संजय क्षीरसागर, शिंदे गटाकडून राजू खरे, अजित पवार गटाकडून माने आणि शरद पवार गटाकडून कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माने दुसऱ्या टर्मसाठी इच्छुक

रमेश कदम यांच्यानंतर गेल्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे यशवंत माने हे मोहोळ मदतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. आता माने दुसऱ्या टर्मसाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर माने अजित पवार गटात सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे अनगरचे माजी आमदार राजन पाटील हेही अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे माने यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ramesh Kadam
NCP Hearing : शरद पवारच निवडून आलेले नाहीत, मग इतरांच्या निवडी योग्य कशा?; अजितदादा गटाचा आक्षेप

राजन पाटील परंपरा राखणार का?

मोहोळ मतदारसंघात राजन पाटील कुटुंबाचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. त्यांनी ठरवलेला उमेदवार आजपर्यंत निवडून आलेला आहे. प्रत्येक वेळी उमेदवार बदलून त्याला निवडून आणणे, हे पाटील यांचे कौशल्य आहे. मात्र, आगामी निवडणुकीत या परंपरेमध्ये खंड पडू शकतो. तसे सूतोवाच अनगरकर पाटील यांनीही केले आहे. परंतु निवडणुका जाहीर होईपर्यंत त्यांच्या या वाक्याचा अर्थ लावणे घाईचे ठरेल.

दुसरीकडे पाटील यांची मतदारसंघातील काही गावांमधील पकड ढिली झाल्याचेही बोलले जाते. राष्ट्रवादीतील फुटीमुळे उत्तर तालुक्यातील मतदारसंघातील गावेही बळीराम साठे यांच्या वर्चस्वाखाली आहेत. त्याचा फटकाही अजित पवार गटाला बसू शकतो. त्यामुळे नवीन उमेदवाराची परंपरा खंडित होणार का, हे येणारा काळच ठरवेल.

Ramesh Kadam
Raj Vs Fadnavis : राज ठाकरेंच्या टोलसंदर्भातील आरोपाला फडणवीसांचे आकडेवारीसह उत्तर...

रमेश कदमांची क्रेझ

रमेश कदम यांच्या कामाच्या धडाक्यामुळे युवा वर्गामध्ये त्यांची क्रेझ आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी मागेल त्याला पाणी देण्याची योजना राबवल्यामुळे मतदारसंघ त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आहे. आगामी काळातही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मागेल त्याला पाणी ही स्कीम ते पुन्हा सुरू करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे रमेश कदम यांचा मतदार पुन्हा त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतो.

Ramesh Kadam
Israel-Palestine War : इस्राईल-पॅलेस्टाईन युद्धाचा खिशाला बसणार चाट; कच्चा तेलाचे दर भडकण्याची शक्यता

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com