Madha Lok Sabha Constituency : ...अखेर फलटणच्या निंबाळकरांनी पत्ता उघड केला; अजितदादा अन् फडणवीसांना झटका!

Lok Sabha Election 2024 : अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिला होता. त्यासाठी त्यांनी वेळापूर येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी फलटणकर आपल्यासोबत असल्याचे म्हणाले होते.
Ranjeetsingh Naik Nimbalkar, Dhairysheel Mohite Patil
Ranjeetsingh Naik Nimbalkar, Dhairysheel Mohite PatilSarkarnama

Phaltan Political News : माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला भाजपमधील मोहिते पाटील तर अजित पवार गटातील नाईक निंबाळकर कुटुंबाने विरोध केला. मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता भाजपने खासदार नाईक निंबाळकरांनाच तिकिट दिले. यावर नाराज झालेल्या दोन्ही कुटुबांनी बंड केले.

आता माढ्यातून भाजपचे नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील Dhairysheel Mohite Patil अशी लढत होत आहे. यात रामराजे नाईक निंबाळकरांचे चिरंजीव अनिकेत यांनी मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ फोडला. यामुळे माढ्यातील राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचाराचा नारळ मंगळवारी (ता. २३०) फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकर Ramraje Naik Nimbalkar यांचे चिरंजीव अनिकेतराजे यांनी फोडला. तसेच तुतारी वाजवून मंदिरात त्यांचे स्वागतही करण्यात आले. फलटणच्या राम मंदिरात झालेल्या या कार्यक्रमासाठी विजयसिंह मोहिते पाटील, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सुभद्रा नाईक निंबाळकर यांच्यासह स्थानिक नेतेमंडळी उपस्थित होते. दरम्यान, आपण तुतारी हाती घेणार असल्याचे रघुनाथराजे नाईक निंबाळकरांनी पूर्वीच स्पष्ट केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ranjeetsingh Naik Nimbalkar, Dhairysheel Mohite Patil
Sangli Congress News : प्रदेश काँग्रेसची टीम गुरुवारी सांगलीत, पण विशाल म्हणतात; कारवाईचा प्रश्नच नाही

काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकर Uttam Jankar यांनी धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिला होता. त्यासाठी त्यांनी वेळापूर येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी फलटणकर (रामराजे नाईक निंबाळकर) आपल्यासोबत असल्याचे म्हणाले होते.

आता झालेल्या फलटणमधील प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी रामराजे उपस्थित नव्हते. मात्र या कार्यक्रमासाठी त्यांचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबळकर आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे नाईक निंबाळकर कुटुंबीय धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ranjeetsingh Naik Nimbalkar, Dhairysheel Mohite Patil
Satej Patil Vs Sanjay Mandlik : सतेज पाटील गटाला धक्का; दक्षिणमध्ये लोकनियुक्त सरपंचांचा भाजपात प्रवेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com