Ahmednagar Politics : विखेंच्या दक्षिणच्या साखरगोडव्यात राणी लंकेंकडून मिठाचा खडा!

Rani Nilesh Lanke On Lok Sabha Election And Sujay Vikhe Patil : राणी लंके यांच्या एन्ट्रीने विखेंची डोकेदुखी वाढली...
Rani Nilesh Lanke, Sujay Vikhe Patil
Rani Nilesh Lanke, Sujay Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Rani Nilesh Lanke News :

"कुणी साखर वाटो," या "डाळ वाटो" आम्ही आमच्या कामाच्या जोरावर लोकांच्या अडी-अडचणींतील कामे सोडवून लोकांच्या मना-मनापर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे आम्ही येणारी Lok Sabha Election 2024 लढवणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी म्हटले आहे. आज त्या राहुरी तालुका दौऱ्यावर होत्या.

Rani Nilesh Lanke, Sujay Vikhe Patil
Nilesh Lanke: लंकेचं ठरेना; महायुती की महाविकास आघाडी?

आमदार नीलेश लंके सत्ताधारी गटात आहेत. सत्ताधारी भाजप विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना उमेदवारी देऊ शकते. तरीही आपण त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणार का? यावर त्या म्हणाल्या, "याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी व आमदार नीलेश लंके घेतील. मात्र आमचा लोकसंपर्क लक्षात घेता लोकांचीच इच्छा आहे की, मी या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावी. समोर खासदार डॉ. सुजय विखे-पाटील निवडणूक रिंगणात असणार आहेत."

राहुरी शहरातील नगर-मनमाड रोडवर मल्हारवाडी चौकात शिवस्वराज्य यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी राणी लंके यांच्यावर "जेसीबी"च्या साह्याने कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली. नगर-मनमाड महामार्गावर जेसीबीतून फुलवृष्टी करण्याच्या प्रयत्नात महामार्ग वाहतूक एकदम विस्कळीत झाली. ती सुरळीत होण्यासाठी बराच वेळ लागला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाजार समितिचे संचालक रामदास बाचकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा परिषदेचे मा. संदस्य धनराज गाडे, मंगेश गाडे, संदीप आढाव, नगरसेवक भाऊसाहेब चौरे, अमोल बेल्हेकर, दलित चळवळीचे बाळासाहेब जाधव उपस्थित होते. शिवस्वराज्य यात्रा राहुरीतील तालुक्यातील उंबरे व मानोरी गणात जाणार आहे. अजून दोन दिवस तालुक्यातील गणनिहाय गाववार यात्रेच्या माध्यमातून लोकसंपर्क करण्यात येणार आहे. नगरला यात्रेचा समारोप होईल.

edited by sachin fulpagare

R...

Rani Nilesh Lanke, Sujay Vikhe Patil
Nagar News: नगरमधील तहसीलदार निलंबित; अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात अनियमिततेचा ठपका

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com