Mumbai Congress : कल्याणमध्ये काँग्रेसला बसणार धक्का; नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर?

Shivsena Eknath Shinde : कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील पक्षात धुसफूस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भिवंडी मतदारसंघात काँग्रेसला जागा न मिळाल्याने नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास असहकार्याच्या भूमिकेत आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Kalyan Political News : कल्याण लोकसभा मतदारसंघात म्हाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अंबरनाथ येथील काँग्रेसचे 7 ते 8 नगरसेवक शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. ते लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.

कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील पक्षात धुसफूस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भिवंडी मतदारसंघात काँग्रेसला जागा न मिळाल्याने नाराज असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास असहकार्याच्या भूमिकेत आहे. तर कल्याण लोकसभा मतदारसंघात देखील महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

या नाराजीचा फायदा विरोधी पक्ष उचलत असून मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश केले जात आहेत. शिवसेना शिंदे गटात सध्या मोठ्या प्रमाणात इतर पक्षीय पदाधिकाऱ्यांचे इन कमिंग सुरू आहे. अंबरनाथ येथील काँग्रेसचे 7 ते 8 नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ शिवसेना बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे दोन्ही गट एकमेकांसमोर निवडणुकीसाठी उभे आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे Shrikant Shinde हे स्वतः तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे असून ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर त्यांच्यासमोर निवडणूक लढवत आहॆत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच शिंदे यांनी अंबरनाथ मधील 7 ते 8 काँग्रेसच्या माजी नगरसेवकांना आपल्या गळाला लावले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Congress
Uddhav Thackeray : 'एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी!; ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

पक्ष प्रवेशात अंबरनाथ पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांचे नाव अग्रेसर असल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत अजून 8 नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेच्या Eknath Shinde शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. याबाबत कमालाची गुप्तता पाळली जात असली तरी, दबक्या आवजात लवकरच यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेनेची कल्याण लोकसभेतील ताकद वाढणार आहे. तर म्हाविकास आघाडीला मोठा फटका पडणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Congress
Ajit Pawar Baramati : इकडं-तिकडं पदाधिकाऱ्यांना अजितदादांचा सज्जड दम; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com