बबनदादांच्या घरात दूध पंढरीची सत्ता; उपाध्यक्षपद राजन पाटलांच्या समर्थकाकडे!

सोलापूर जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदी रणजितसिंह शिंदे; उपाध्यक्षपदी दीपक माळी बिनविरोध
Ranjit Singh Shinde-Deepak Mali
Ranjit Singh Shinde-Deepak Mali Sarkarnama

सोलापूर : सोलापूर जिल्हा दूध संघाची (दूध पंढरी dudh pandhari) सत्ता माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे (baban shinde) यांच्या घरात गेली असून उपाध्यक्षाच्या माध्यमातून मोहोळचे माजी आमदार पुन्हा जिल्ह्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. दूध संघाच्या अध्यक्षपदी आमदार शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी माजी आमदार राजन पाटील यांचे खंदे समर्थक दीपक माळी यांची बिनविरोध निवड झाली आहे. (Ranjit Singh Shinde as President of Solapur District dudh sangh; Deepak Mali Vice President)

दूध संघाच्या सोलापुरातील कार्यालयात संघाचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड मंगळवारी (ता. ८) करण्यात आली. आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, दीपक साळुंखे, सुरेश हसापुरे, चंद्रकांत देशमुख, योगेश सोपल, प्रकाश चवरे, लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबा करांडे, अशोक देवकते आदी नेतेमंडळी या वेळी उपस्थित होती.

Ranjit Singh Shinde-Deepak Mali
प्रशांत परिचारकांना दे धक्का : खंद्या समर्थकाने घेतली शरद पवारांची भेट

जिल्हा दूध संघावर नवे संचालक मंडळ विराजमान झाले आहे. संघाचा कारभार सुधारण्यासाठी सर्वांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, त्यासाठी दरमहा संघाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात येईल. त्या माध्यमातून अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दूध संघाची ठिकठिकाणी जवळपास दोनशे कोटींची मालमत्ता आहे. जिल्हाभरात विविध तालुक्‍यांमध्ये दूध संकलन केंद्रे असून एक पशुखाद्य निर्मितीचा कारखानादेखील आहे. त्याचे विश्‍वस्त म्हणून सर्वांनी चांगले काम करून दूध संघाला उर्जितावस्था आणावी, असे आवाहन या वेळी वरिष्ठ नेतेमंडळींकडून करण्यात आले.

Ranjit Singh Shinde-Deepak Mali
पवारांना देवेंद्र फडणवीसांना संपवायचे आहे...व्हिडिओमधील संभाषणाने खळबळ!

सोलापूर जिल्हा दूध संघाला पुन्हा एकदा उर्जितावस्था आणण्यासाठी एकमताने शेतकरीहिताचे निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेतेमंडळींचे वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात येईल. सर्व संचालकांना विश्‍वासात घेऊन दूध संकलन वाढविण्याची कार्यवाही तत्काळ हाती घेतली जाईल. त्यासाठी कामगारांचीही मदत घेण्यात येईल. शेतकऱ्यांना खासगी दूध संघांच्या बरोबरीने दर देऊन ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर दूध संघ चालविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

Ranjit Singh Shinde-Deepak Mali
गिरीश महाजनांना मोका लावा, फडणवीस, मुनगंटीवार यांना अडकवा... : असा ठरला प्लॅन

बबनदादांच्या काळातील ते दिवस पुन्हा आणण्याचा प्रयत्न

सोलापूर जिल्हा दूध संघाला खासगी दूध संघांशी स्पर्धा करताना काटकसरीचा कारभार कारावा लागणार आहे. सध्या संघाचे दूध संकलन 20 हजार लिटरपर्यंतच असून आमदार बबनराव शिंदेंच्या कार्यकाळात ते संकलन तीन लाख लिटरपर्यंत पोचले होते. ते दिवस पुन्हा आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागतील. सरकारदरबारी जे प्रश्‍न असतील, ते आम्ही नेतेमंडळी सोडवू, असे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी संघाच्या पदाधिकारी निवडीनंतर सांगितले.

Ranjit Singh Shinde-Deepak Mali
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात उद्योग रथयात्रा काढणार!

दूध संघाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न

सोलापूर जिल्हा दूध संघाची परिस्थिती कठीण आहे. अनेक स्पर्धक बाजारात निर्माण झाले आहेत. त्यांच्यावर मात करून जिल्हा दूध संघ उर्जितावस्थेत आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतील, असा विश्‍वास आहे. त्यांना आम्ही सर्वजण निश्‍चितपणे मदत करू. दुधाला चांगला दर देऊन शेतकऱ्यांचा विश्‍वास पुन्हा संपादन करावा लागेल. आपल्याकडे पावडर निर्मितीचा प्लॅण्ट नाही, त्यामुळे बाहेरील उद्योगातून पावडर तयार करून घ्यावी लागेल, असे आमदार बबनराव शिंदे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com