Karmala Political : 'आदिनाथ' वाचवण्यासाठी रणजितसिंह मोहिते-पाटलांचा पुढाकार...

Jagtap, Patil group support the decision : निर्णयाला जगताप, पाटील गटाचा पाठिंबा.
Ranjitsinh Mohite - Patil
Ranjitsinh Mohite - PatilSarkarnama
Published on
Updated on

Karmala Political : आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पुढाकार घेण्याची भूमिका घेतली आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप, नारायण पाटील, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्याशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे. आदिनाथ कारखाना सहकारीच राहण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, अशी जाहीर भूमिका त्यांनी मांडली आहे.

त्यामुळे अनेक वर्षांपासून कारखान्याचे पुढे काय होणार ? निवडणूक होणार की पुन्हा एकदा भाडेतत्त्वावर चालवायला दिला जाणार ? याबाबतच्या चर्चा अकलूज येथे झालेल्या या निर्णयाने बदलल्या आहेत. मंगळवारी (दि. 16 जानेवारी) अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर करमाळा तालुक्यातील प्रमुख नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भूमिका जाहीर केली आहे.

Ranjitsinh Mohite - Patil
Sushilkumar Shinde : बड्या नेत्याकडून मला अन् प्रणितीला भाजप प्रवेशाची ऑफर, पण...; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

रणजितसिंह यांनी कालपासूनच कार्यकर्त्यांना फोन करून निरोप दिले होते. मात्र, याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविरोध करण्याचा पुढाकारदेखील रणजितसिंह यांनी घेतला होता. त्यानंतर आदिनाथ कारखान्यासाठी त्यांनी पुढाकार घेत तालुक्यातील सर्व गटाच्या नेतेमंडळींना एकत्र केले. अकलूज येथे जाईपर्यंत कोणालाच नेमका काय विषय आहे, याची कल्पना नव्हती.

मात्र अकलूज येथे गेल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यापूर्वी रणजितसिंह यांनी जयवंतराव जगताप, नारायण पाटील, विलासराव घुमरे यांना आदिनाथ कारखान्याबाबत आपण काय करू शकतो, याविषयी बंद खोलीत चर्चा करून भूमिका मांडली. त्यास सर्वांचे समर्थन मिळाले, त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांसमोर निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी रणजितसिंह मोहिते - पाटील म्हणाले, आदिनाथ कारखाना हा सहकारीच राहावा, याच्यासाठी आपण पुढाकार घेत आहोत.

यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही आणि कोणीही या निर्णायाकडे राजकीय भूमिकेतून पाहू नये. हा कारखाना आणि आमचे एक वेगळे नाते आहे. कारखाना हा सहकारी राहावा, याच्यासाठी मी प्रयत्न करायचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आपण सर्वांनी सहमती देण्याची भूमिका घेतली आहे. कारखान्यावर विविध बँकांचे 230 कोटी रुपये कर्ज आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मार्चअखेर राज्य बँकेचे पैसे भरले नाहीत, तर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू होईल किंवा अन्य कोणताही निर्णय होऊ शकतो. त्यामुळे मार्चपूर्वी आपल्याला राज्य बँकेचे पैसे भरणे गरजेचे आहे, त्यानंतर इतर देणी देण्याचे काम करण्यात येईल. यावेळी माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले, आतापर्यंत आदिनाथ चालवणारी सर्व मंडळी ही शेतकऱ्याची लेकरं होती. त्यांना सर्व शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती होत्या.

पण यामध्ये राजकारण झाले. कारखाना वाचवण्यासाठी तुम्ही जो पुढाकार घेत आहात, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आज तालुक्याचे चारही बाजूला कारखाने झाले आहेत. अशा परिस्थितीत आदिनाथ अडचणीतून बाहेर काढून चालवण्याचे आव्हान रणजितसिंह यांनी घेतले आहे. त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार नारायण पाटील म्हणाले, आज अकलूजला बोलावलं आहे, म्हटल्यानंतर राजकारणाचा काहीतरी विषय होईल. लोकसभेचा काहीतरी विषय असेल असं वाटलं होतं, पण आल्यानंतर तुम्ही 'आदिनाथ'बाबत जो विषय घेतला आहे तो निश्चितपणे तालुक्याच्या हिताचा निर्णय आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयाच्या पाठीमागे करमाळा तालुका ठामपणे उभा आहे. हा कारखाना म्हणजे करमाळा तालुक्याचे दैवत श्री आदिनाथ महाराजांच्या नावाने आहे.

Ranjitsinh Mohite - Patil
Shiv Sena News : उद्धव ठाकरेंसाठी आशेचा किरण! शिंदेंसोबत असूनही 'यांनी' अवाक्षरही काढले नाही

तुम्ही कारखाना अडचणीतून बाहेर काढताय, म्हणजेच तुम्ही आमचे दैवत अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहात. याबद्दल तुमचा आभारी असल्याचे त्यांनी सांगितले. विलासराव घुमरे म्हणाले, या कारखान्याबाबत मोहिते - पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल. मार्चअखेरला फक्त दोन महिने शिल्लक आहेत. बँकेचे पैसे भरले गेले नाहीत, तर कारखाना कोणाला कसा चालवायला द्यायचा, यासाठी एक यंत्रणा काम करते आहे.

अशा परिस्थितीत ही जबाबदारी रणजितसिंह यांनी घेतली आहे. कारखाना पुढच्यावर्षी सुरू होईपर्यंत शंभर कोटी रुपये खर्च होणार आहेत. एवढे मोठे धाडस केलं जात आहे. या धाडसाला सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजेत आणि कारखाना हा सहकारीच राहिला पाहिजे, असे ते म्हणाले. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोने आदिनाथ कारखाना 25 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतला होता.

नंतर मात्र ही सर्व प्रक्रिया थांबली. त्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने हा कारखाना चालवण्याचा प्रयत्न झाला. मात्र चालू हंगामात कारखाना चालू शकला नाही. तानाजी सावंत यांनी आपल्या मर्जीतील प्रशासकीय मंडळ कारखान्यावर आणले आहे. सध्या कारखाना अडचणीत असून तो बंद आहे.

(Edited by Amol Sutar)

R...

Ranjitsinh Mohite - Patil
Shivsena (UBT) News : उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेच्या 'मास्टरस्ट्रोक'नंतर शिवसैनिकांमध्ये जोश...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com