Mohite Patil : जयकुमार गोरेंच्या गडात मोहिते पाटलांच्या गाठीभेटी; माढ्यातील संघर्ष आणखी धारदार होण्याची चिन्हे!

Ranjitsinh Mohite-Patil Maan-Khatav Tour : सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील गटातील संघर्ष तीव्र होत आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी गोरेंना आव्हान दिल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटलांच्या माण-खटावमधील भेटी चर्चेत आल्या आहेत.
Ranjitsinh Mohite-Patil
Ranjitsinh Mohite-PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 August : सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. नगरपालिकेपासून नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीपर्यंत गोरेंच्या नेतृत्वाखालील भाजपला खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी टक्कर दिली. या सर्व प्रक्रियेत माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील अलिप्त होते. मात्र, गोरे यांच्या माण-खटाव मतदारसंघात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्यांच्या नुकत्याच भेटीगाठी घेतल्या आहेत.

रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे माजी आमदार आहेत. मात्र, भाजपमधील विद्यमान नेतृत्वाने त्यांना दूर ठेवल्याचे दिसून येत आहे. अकलूज नगरपालिका निवडणुकीत मोहिते पाटील यांची भाजपसोबत निवडणूक लढविण्याची इच्छा होती. मात्र, माजी आमदार राम सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधाची भूमिका घेत मोहिते पाटील यांना सोबत घेण्यास नकार दिला, त्यामुळे भाजपने माजी आमदार सातपुते यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगरपालिकेची निवडणूक प्रथमच लढवली. त्यात काही जागांवर विजय मिळविण्यात भाजपला यशही आले.

नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांना दूरच ठेवले. इच्छा असूनही त्यांना भाजपसोबत काम करता आले नाही. मात्र जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नगरपालिकांपासून महापालिका, जिल्हा परिषदेव एकहाती सत्ता आणली, त्यामुळे गोरे-सातपुतेंवर भाजपश्रेष्ठींचा विश्वास आणखी वाढला.

विधान परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकहाती निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत पालकमंत्री गोरे आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष आणखी धारदार बनला. सध्या मोहिते पाटील आणि पालकमंत्री गोरे यांच्यातून विस्तवही जात नाही.

Ranjitsinh Mohite-Patil
BJP Politic's : पुणे पदवीधरसाठी भाजपचा मास्टरप्लॅन; फडणवीस-चव्हाण सोलापुरात, चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली रणनीती!

जिल्हा परिषद इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाला मोहिते पाटील यांनी दिलेले शिवरत्न हे नाव हटवून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सभागृह करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे समर्थन करताना पालकमंत्री गोरेंनी सगळीकडे आपल्याच नावाचा आग्रह कशासाठी असा सवाल केला होता. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजप विशेषतः गोरे आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे.

या सर्व पाश्वभूमीवर माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा ‘माण-खटाव’चा दौरा विशेष ठरत आहे. सातारा जिल्हा परिषद आणि जिल्हा बॅंकेचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब गोडसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोविंदराव शिंदे यांच्या निधनाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच एका लग्नाला मोहिते पाटील यांनी हजेरी लावली.

Ranjitsinh Mohite-Patil
Deshmukh Politic's : भाजपत साईड लाईन झालेल्या दोन देशमुखांना श्री सिद्धरामेश्वर पावणार; समर्थक नगरसेवकांसोबत एकत्र जाऊन घेतले दर्शन...

यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या संपर्क कार्यालयासही रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भेट दिली. यावेळी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा आणि चर्चा झाल्याचे मोहिते पाटील यांनी आपल्या सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटले आहे. माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, माजी सभापती श्रीराम पाटील आणि इतर नेतेमंडळीही या वेळी उपस्थित होती, त्यामुळे गोरे यांच्या गडातील मोहिते पाटील यांच्या गाठीभेटी विशेष मानल्या जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com