BJP Politic's : पुणे पदवीधरसाठी भाजपचा मास्टरप्लॅन; फडणवीस-चव्हाण सोलापुरात, चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली रणनीती!

BJP Western Maharashtra meeting : भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक 20 ऑगस्टला सोलापुरात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार असून पदवीधर निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis-Ravindra Chavan-Chandrakant Patil
Devendra Fadnavis-Ravindra Chavan-Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 August : भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक येत्या गुरुवारी (ता. 20 ऑगस्ट) सोलापुरात होणार आहे. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सोलापुरात येणार आहेत. याबैठकीत पक्षश्रेष्ठी हे कार्यकर्ते आणि नवख्या नेत्यांना शिस्तीचे धडे देणार असून पदवीधर निवडणुकीची रणनीती ठरविली जाण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, मंडलाध्यक्ष, एसआयआरचे काम पाहणारे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. खुद्द मुख्यमंत्री फडणवीसच सोलापुरात येणार असल्याचे भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील झाडून सर्व नेते गुरुवारी सोलापुरात असणार आहेत.

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पक्षशिस्तीचे धडे देणार आहेत. तसेच संघटनात्मक कामाचा आढावाही घेणार आहेत. याशिवाय नगरसेवकांची बैठकही होणार आहे. ही बैठक गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत असणार आहे. बैठकीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे.

सकाळच्या सत्रात ११ ते दुपारी एकपर्यंत मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, मंडलाध्यक्ष, एसआयआरचे काम पाहणारे प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक होणार आहे. पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी संबंधित पदाधिकारी चोखपणे पार पाडत आहेत की नाही, याची तपासणी या वेळी करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते हे आढावा घेणार आहेत.

Devendra Fadnavis-Ravindra Chavan-Chandrakant Patil
Deshmukh Politic's : भाजपत साईड लाईन झालेल्या दोन देशमुखांना श्री सिद्धरामेश्वर पावणार; समर्थक नगरसेवकांसोबत एकत्र जाऊन घेतले दर्शन...

पश्चिम महाराष्ट्राची बैठक असल्याने पदवीधर निवडणुकीसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. स्वतः चंद्रकांतदादांनी दोन टर्म या मतदारसंघाचे प्रतिधित्व केले आहे, त्यामुळे पदवीधर निवडणूक जिंकण्याची स्ट्रटेजी यावेळी भाजपकडून ठरविली जाणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आणखी निश्चित झाला नसून तो आज किंवा उद्या निश्चित होण्याची शक्यता आहे.

चंद्रकांतदादांनी दोन वेळा जिंकलेला पुणे पदवीधर मतदारसंघ मागील निवडणुकीत भाजपने मागवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी भाजपचे संग्राम देशमुख यांचा पराभव केला होता. त्यामुळे पुणे पदवीधर पुन्हा जिंकणे भाजपचे उद्दिष्ट असणार आहे. त्यासाठी लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांना भाजपने गळाला लावल्याची चर्चा आहे, त्यांच्यासाठी चंद्रकांतदादा आग्रही असल्याची माहिती आहे, त्यामुळे पुणे पदवीधर जिंकण्याची रणनीती या विभागीय बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis-Ravindra Chavan-Chandrakant Patil
Modi Cabinet : पीयूष गोयल यांचे मंत्रिपद जाणार? पक्षातील नव्या जबाबदारीनंतर चर्चांना फुटले तोंड, कुणाची लागणार वर्णी?

...अन्‌ आमदाराने मागच्या मागे काढता पाय घेतला

पुण्यात मागे झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत एका आमदाराच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या वेळी संबंधित आमदार त्या बैठकीला उपस्थित होता. मात्र, मागच्या बाजूला बसलेल्या त्या आमदाराने आपल्याविरोधात झालेल्या तक्रारी पाहून मागच्या मागे बैठकीतून निघून जाणे पसंत केले होते. त्याची खमंग चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com