Mohite Patil : भाजपच्या निमंत्रण पत्रिकेतून मोहिते पाटलांना डावलले; विमान कंपनीच्या पत्रिकेत मात्र सर्वांची नावे

Solapur Air Service : भाजपच्या निमंत्रण पत्रिकेतून मोहिते पाटील यांना डावलण्यात आले असले तरी विमान कंपनीच्या निमंत्रण पत्रिकेत मोहिते पाटील यांचे नाव आहे. भाजपने विमान सेवेच्या निमंत्रण पत्रिकेतून मोहिते पाटील यांचे नाव वगळून काय संदेश दिला आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
Ranjitsinh Mohite Patil
Ranjitsinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 June : गेले काही वर्षांपासून चर्चेत असलेला सोलापूर येथील विमान सेवेच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम आज (ता. 09 जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्ह्यातील सर्व आमदारांची नावे असताना विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना या कार्यक्रमातून डावलण्यात आले आहे. या कार्यक्रम पत्रिकेत सर्व आमदारांची नावे असताना मोहिते पाटील यांचेच नाव वगळण्यात आले आहे. दुसरीकडे, प्लाय-९१ या विमान कंपनीच्या कार्यक्रम पत्रिकेत मात्र मोहिते पाटील यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यक्रम पत्रिकेतून मोहिते पाटील यांना डावलण्याबाबत चर्चा होत आहे.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्याचे सांगून रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार राम सातपुते यांनी पक्षाकडे केली आहे. त्याही परिस्थितीत मोहिते पाटील हे पक्षाच्या कार्यक्रमाला नियमितपणे हजेरी लावत आहेत. आजच्या कार्यक्रमालाही प्लाय 91 या विमान कंपनीच्या कार्यक्रम पत्रिकेत मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदारांची नावे आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सोलापूर (Solapur) ते गोवा विमानसेवेचे उद्‌घाटन होत आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, समाधान अवताडे या आमदारांसह जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, शशिकांत चव्हाण आणि सोलापूरच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांची नावे छापण्यात आले आहेत. यातून भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नाव वगळण्यात आले आहे, यातून भाजपने काय साध्य केले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मध्यंतरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांना रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी रणजितसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. त्या वेळी मोहिते पाटील हे खाली मान घालून बसले होते. त्यावरूनही राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्यावर टीका केली होती.

Ranjitsinh Mohite Patil
Maharashtra Politics : 'आजही मला उद्धव ठाकरेंचे फोन येतात...', एकनाथ शिंदेंचे मंत्री संजय राठोडांचा खळबळजनक दावा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थिती झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची इंट्री होताच मोहिते पाटील यांनी काढता पाय घेतला होता. त्यांनी जाताना चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री गोरे यांच्या कानात काहीतरी सांगितले होते. त्यानंतरच मोहिते पाटील हे कार्यक्रमस्थळाहून निघून गेले होते.

Ranjitsinh Mohite Patil
BJP Shiv Sena clash : महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर; मंत्री महाजनांनी वादाला फोडलं तोंड, भाजपसाठी काळ वाईट...

भाजपच्या एका गटाकडून मोहिते पाटील यांच्यावर कारवाईची मागणी होत असताना मोहिते पाटील हे नियमितपणे भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत, हे विशेष आहे. मात्र, आजच्या भाजपच्या निमंत्रण पत्रिकेतून मोहिते पाटील यांना डावलण्यात आले असले तरी विमान कंपनीच्या निमंत्रण पत्रिकेत मोहिते पाटील यांचे नाव आहे. भाजपने विमान सेवेच्या निमंत्रण पत्रिकेतून मोहिते पाटील यांचे नाव वगळून काय संदेश दिला आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com