Ranjitsinh Mohite Patil : चंद्रकांतदादांनी रणजितसिंह मोहिते पाटलांचा विषय क्लिअरच केला; म्हणाले, ‘....तोपर्यंत मोहिते पाटील बैठकीला येणारच’

Chandrakantdada Patil News : मोहिते पाटील यांना पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याविषयीच्या तक्रारी आणि मोहिते पाटील यांचे म्हणणे केंद्रीय अनुशासन समितीपुढे मांडले आहे.
Chandrakantdada Patil -Ranjitsinh Mohite Patil
Chandrakantdada Patil -Ranjitsinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 01 June : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून कारणे दाखवा नोटीस बजावलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई कधी होणार, याची चर्चा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा रंगली आहे. बावनकुळेंपाठोपाठ उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्यातही हाच प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी चंद्रकांतदादांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांचा विषयच क्लिअर केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या जयंतीच्या कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील उपस्थित होते. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे चंद्रकांत पाटील (Chandrakantdada Patil ) यांच्यासोबत कार्यक्रमास आले होते. मात्र, पालकमंत्री गोरे हे कार्यक्रमाला उशीरा आले होते. गोरे आल्यानंतर काही वेळातच मोहिते पाटील यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता, त्याची चर्चा सोलापुरात रंगली होती.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) यांच्यावर कारवाई कधी होणार, असा प्रश्न मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही विचारण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा विषयच क्लिअर करून टाकला. आमदार मोहिते पाटील यांना पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याविषयीच्या तक्रारी आणि मोहिते पाटील यांचे म्हणणे केंद्रीय अनुशासन समितीपुढे मांडण्यात आलेले आहे. अनुशासन समितीचा निर्णय अद्याप झालेला नाही.

आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर केंद्रीय अनुशासन समितीने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. या समितीकडून ज्या वेळी मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होईल, तेव्हाच मोहिते पाटील हे भाजपच्या कार्यक्रमाला येण्याचे बंद करतील. मात्र, जोपर्यंत अनुशासन समितीकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत ते भाजपच्या कार्यक्रमाला येतील, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Chandrakantdada Patil -Ranjitsinh Mohite Patil
Mahadev Jankar : महादेव जानकरांचे नवे राजकीय सीमोल्लंघन फसले; प्रमुख नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने समर्थकांची घोर निराशा

माजी आमदार राम सातपुते यांंनी भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षविरोधी कारवाई केल्याचे सांगून पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली हेाती. त्यानंतर त्यांना कारणे दाखवा नोटीसही भाजपकडून देण्यात आली होती. त्यावर मोहिते पाटील यांनी उत्तर दिले आहे. त्यापुढे काहीही झालेले नाही, ते भाजपच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहेत, त्यामुळे मोहिते पाटील यांच्यावरील कारवाईचा प्रश्न भाजप नेत्यांना विचारला जात आहे.

केंद्रीय अनुशासन समितीचा निर्णय येत नाही तोपर्यंत आमदार रणजिसिंह मोहिते पाटील यांना भाजपच्या कार्यक्रमाला येण्यास अटकाव करता येणार नाही. जेव्हा अनुशासन समितीचा निर्णय येईल किंवा त्यांना पक्षातून काढून टाकले आहे, असे जाहीर होईल, तेव्हा मोहिते पाटील हे स्वःताहून कार्यक्रमाला येण्याचे बंद करतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Chandrakantdada Patil -Ranjitsinh Mohite Patil
Prithviraj Chavan : भाजपबाबत पृथ्वीराजबाबांनी केले मोठे भाकीत; म्हणाले, ‘सत्तेच्या जीवावरील भाजप फार काळ...’

तेव्हा मान खाली घातली होती...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नुकतेच सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी कारवाई कधी होणार, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मान खाली घालून बसले होते. त्याची चर्चा दोन दिवस सोलापुरात रंगली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com