Phaltan BJP News : तीस वर्षे सत्तास्थाने तुमच्याकडे; कामे करण्यास कोणी रोखले होते : रणजितसिंह निंबाळकरांचा टोला

Ranjitsinh Naik Nimbalkar फलटण येथे राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Nimbalkar, Sanjivraje Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Nimbalkar, Sanjivraje Naik Nimbalkarsarkarnama
Published on
Updated on

Phaltan BJP News : फलटणसह माढा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदल्यासाठी आम्ही निघालो आहे. याबद्दल काहींना खेद वाटत असेल तर, आम्ही त्यांना विकास कामे करुन देतो. त्यांनी त्याची उद॒घाटने करावीत. आम्ही उद॒घाटनालाही येणार नाही. पण, चांगल्या कामात अडथळा निर्माण करु नका. तीस वर्षे तुमच्याकडे सर्व सत्तास्थाने होती. त्यावेळी विकास कामे करण्यास आपल्याला कोणी रोखले नव्हते, असा टोला माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व संजीवराजे निंबाळकर यांना लगावला आहे.

फलटण Phaltan News येथे राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा उभारण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापार्श्वभूमीवर माढाचे खासदार रणजितसिंह निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थोर नेत्यांच्या पुतळ्यासाठी विरोधकांनी कधी एक रुपयांचा तरी निधी आणला होता का, असा सवालही केला.

खासदार निंबाळकर म्हणाले, भारत देश सर्वात वेगाने वाढणारा देश आहे. महागाईचा दर सगळ्यात न्युनतम आहे. आपला देश जगातील पाचवी आर्थिक महासत्ता झाली आहे. आम्हाला विश्वास आहे की २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपला देश जगातील तिसरी महासत्ता होणार आहे. माढा मतदारसंघात तीन, तीन रेल्वे प्रकल्पाला निधी दिला आहे.

फलटण बारामती रेल्वे मार्गाला ८०० कोटींची मंजूरी दिली आहे. फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग तसेच निरा देवघरला निधी दिला आहे. धोम बलकवडीच्या कालव्यांच्या कामालाही मंजूरी दिली आहे. इतक्या मोठ्याप्रमाणात विकासाची कामे ही आर्थिक महासत्ता झाल्याशिवाय होऊ शकत नाही. काही लोकांनी आम्हाला करायचे होते, असे म्हणत आहेत.

पण त्यांना माझे उघड चॅलेंज आहे. त्यांनी थोर नेत्यांच्या पुतळ्यासाठी कधी एक रुपयांचा तरी निधी आणला होता का. ३० वर्षे सर्व सत्तास्थाने आपल्याकडे होती. त्यावेळी विकास कामे करण्यास आपल्याला कोणी रोखले नव्हते, असा सवाल खासदार निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Nimbalkar, Sanjivraje Naik Nimbalkar
Phaltan Political News : भाजप आमदाराकडून माजी जलसंपदामंत्र्यांची पोलखोल; म्हणाले...

समाजाला प्रेरणा देणारी ही आपली शक्तीस्थळे असून त्यांच्या सुशोभिकरणासाठी निधी मिळला असताना कोणी खेद व्यक्त करत असेल तर आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. फलटण शहरातील १०५ रस्त्यांची कामे मंजूर असून २५ कोटीचे रस्ते मंजूर झाले आहेत.लवकरच शंभर कोटींपेक्षा मोठा रस्ता मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून मिळणार आहे. फलटण व माढा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यास आम्ही निघालो आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Nimbalkar, Sanjivraje Naik Nimbalkar
Satara News : गिरणी कामगारांच्या घरांसाठी शिवेंद्रसिंहराजेंचा पुढाकार; साताऱ्यात मेळाव्याचे आयोजन

याबद्दल काहींना खेद वाटत असेल तर आम्ही विकास कामे करुन देतो. आपण उद॒घाटने करावीत आम्ही उद॒घाटला सुध्दा येणार नाही. पण, चांगल्या कामात अडथळा निर्माण करु नका. निवडणुका जवळ आल्यानंतर कामे सुचल्याचे काहीजण बोलत आहेत. मुळात तीन वर्षे आमचे सरकार नव्हते. कोरोनात तीन वर्षे खासदार निधी नव्हता. लोकसभेच्या निवडणुका लागत नाहीत तोपर्यंत तोपर्यंत शेकडो कोटी रुपये फलटणला येतील. त्यामुळे आनंदाच्या गोष्टीत सामील व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Edited By : Umesh Bambare

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Nimbalkar, Sanjivraje Naik Nimbalkar
Ramraje Nimbalkar : रामराजेंनी घेतली विजयसिंह मोहिते पाटलांची भेट; नेमकं काय कारण?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com