Maan : तहसीलदारांचा शिक्का चोरुन बनवली रेशनकार्ड; दहिवडी पोलिसांनी लावला छडा...

Dahiwadi Police माण तालुक्यातील ज्या कोणास सुर्यकांत उर्फ पप्पु बाळासाहेब आवटे (रा. दहिवडी ) याने रेशनकार्ड दिलेली आहेत, त्यांनी दहिवडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले आहे.
Kesari Ration Card
Kesari Ration Cardsarkarnama
Published on
Updated on

Maan News : माण तहसीलदार Tahashildar यांचा शिक्का चोरुन त्याच्या साहाय्याने बनावट केशरी रेशनकार्ड बनविण्याचा घोटाळा दहिवडी पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणात एकाला ताब्यात घेतले असून या घटनेमुळे महसूल विभागात revenue department खळबळ उडाली आहे.

दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बनावट रेशनकार्ड कोणीतरी दिली असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने पोलिसांनी माहिती घेतली. त्यामध्ये दहिवडी शहरातील तिघांना सदरची बनावट रेशनकार्ड दिल्याची माहिती मिळाली. सदरच्या व्यक्तींना माणच्या तहसिल कार्यालयाशी संपर्क साधून त्यांना माहिती देण्यास सांगण्यात आले.

या माहितीवरून तहसीलदार माण यांनी पुरवठा निरीक्षक यांना चौकशी करुन गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले. पुरवठा निरीक्षक तहसिल कार्यालय माण यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असुन सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे हे करीत आहेत. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर सुर्यकांत उर्फ पप्पु बाळासाहेब आवटे (रा. दहिवडी ता.माण जि. सातारा) या संशयिताची माहिती घेवुन त्यास सदर गुन्हा प्रकरणी अटक केली.

Kesari Ration Card
Maan : कुळकजाईचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

त्याचेकडे गुन्ह्याचा तपास केला असता त्याने गुन्ह्यातील साक्षीदार यांना दिलेली केशरी रंगाची रेशनकार्ड ही त्यांच्याकडून प्रत्येकी ३,३०० रुपये घेवुन दिली असल्याचे उघड झाले. तसेच बनावट रेशनकार्ड देण्यासाठी वापरलेले तहसीलदार माण, दहिवडी या नावाने असलेला शिक्का हा तहसिल कार्यालयातुन चोरला असल्याचे सांगितले. त्याने चोरलेल्या शिक्याचा गैरवापर करुन बनावट रेशनकार्ड लोकांना दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Kesari Ration Card
Maan : म्हसवड-पंढरपूर महामार्गाचे निकृष्ट काम; आमदार गोरेंची थेट गडकरींकडे तक्रार

आरोपीकडुन सदरचा शिक्का हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे, एस. एन. केंगले, आर. एस. बनसोडे, पी. बी. कदम यांनी केली.

Kesari Ration Card
Satara : साखर कारखानदारीला उभारी द्या : शिवेंद्रराजेंनी घेतली केंद्रीय उद्योग मंत्र्यांची भेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com