Maan : कुळकजाईचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

मागील काही महिन्यांपासून Few Months माणमधील Maan महसूल विभाग Reveneu Department वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला आहे. या लाचलुचपतच्या Bribe कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभाग हादरला आहे.
Bribe in Maan
Bribe in Maansarkarnama

दहिवडी : नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र व साठे खताच्या दस्ताची नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी चार हजारांची मागणी कुळकजाईच्या तलाठ्याने केली होती. ही रक्कम स्वीकारताना त्याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. त्यामुळे माण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत कुलमुखत्यार पत्र व साठेखताच्या दस्ताची नोंद करून तसा सातबारा उतारा देण्यासाठी कुळकजाई (ता. माण) येथील तलाठी युवराज एकनाथ बोराटे (वय ५५) यांने तक्रारदारांकडे चार हजार रूपयांची मागणी केली होती.

याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यानंतर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विक्रम पवार, पोलिस नाईक विशाल खरात, पोलिस कॉन्स्टेबल तुषार भोसले यांनी बुधवारी सापळा रचला. तसेच सदर लाचेची रक्कम स्वीकारताना बोराटे यास रंगेहात पकडून ताब्यात घेतले.

Bribe in Maan
Akola Crime News| अकोल्यातील ठाकरे गटाचे उपशहरप्रमुख विशाल कपले यांची हत्या

पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली साताराचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.मागील काही महिन्यांपासून माणमधील महसूल विभाग वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला आहे. या कारवाईमुळे संपूर्ण महसूल विभाग हादरला आहे.

Bribe in Maan
Karad : पन्नास हजारांची लाच मागितली; कराडातील लोकसेवकांवर गुन्हा दाखल...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com