Ravikant Tupkar Vs Raju Shetti: 'स्वाभिमानी' फुटीच्या उंबरठ्यावर ? तुपकरांनी शेट्टींचे आवाहन धुडकावले ; शिस्तपालन समितीसमोर गैरहजर..

Swabhimani Shetkari Sanghatana Politics: तुपकर वेगळा डाव मांडणार का?
Ravikant Tupkar, Raju Shetti
Ravikant Tupkar, Raju Shettisarkarnama
Published on
Updated on

Pune Political News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टींच्या कार्यपद्धतीवर पक्षातील नेते रविकांत तुपकरांनी जाहीर नाराजी व्यक्त करीत शिस्तपालन समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. "स्वाभिमानी'आता फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर स्वाभिमानीतही फूट पडणार काय?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजू शेट्टींच्या कार्यपद्धतीवरही तुपकरांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तुपकरांनी आपली भूमिका शिस्तपालन समितीसमोर मांडण्यासाठी त्यांना 15 ऑगस्टपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, तुपकर हे शिस्तपालन समितीसमोर हजर झालेच नाही.

Ravikant Tupkar, Raju Shetti
Rahul Gandhi News : राहुल गांधी खरंच 'गांधी' आहेत का ? शरद पोक्षेंच्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले...

माध्यमांसमोर आपली भूमिका न मांडता शिस्तपालन समितीसमोर आपले म्हणणे मांडावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते. याबाबत पुण्यात पक्षाच्या शिस्तपालन समितीची बैठकही आयोजित केली होती. मात्र, तुपकर त्या बैठकीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे स्वाभिमानीतून फुटून तुपकर वेगळा डाव मांडणार का?, अशा चर्चांना ऊत आला होता. मात्र, त्यानंतर तुपकरांना आणखी एक संधी देत आपले म्हणणे मांडण्यासाठी त्यांना 15 ऑगस्टपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, तुपकर हे 15 ऑगस्टपर्यंत शिस्तपालन समितीसमोर हजर झालेच नाही.

Ravikant Tupkar, Raju Shetti
Rahul Gandhi News : राहुल गांधींच्या समर्थनार्थ अमरावतीत लावलेले बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी फाडले.. ; ...मोहब्बत की जीत

"फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही, त्यासाठी खांदा इमानदार आणि खानदानी असावा लागतो," असा टोला तुपकरांनी शेट्टी यांचे नाव न घेता काही दिवसापूर्वी लगावला. त्यानंतर तुपकरांनी आपली भूमिका माध्यमांसमोर न मांडता, शिस्तपालन समितीसमोर आपले म्हणणे मांडावे, असे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी १५ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. काल (मंगळवारी) ही मुदत संपली. तुपकर समितीसमोर हजर झालेच नाही. त्यामुळे स्वाभिमानीतून फुटून तुपकर वेगळा डाव मांडणार का?, या चर्चांना उधाण आले आहे.

"नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटत असतील, तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. ज्याच्यासोबत आपण राहतो त्याने जर केसाने गळा कापला तर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही, परंतु मी आत्महत्या करणार नाही. संघटना ही कुणाची खासगी मालमत्ता नाही, संघटना कार्यकर्त्यांच्या ताकदीवर उभी राहिली, त्यामुळे संघटना सगळ्या कार्यकर्त्यांची आहे, असे जाहीर करत तुपकरांनी शेट्टींच्या विरोधात बंडाचे निशाण तर फडकविले नाही,अशी चर्चा आहे. "कार्यकर्त्यांच्या बळावर मी कुणाशीही खेटायला तयार आहे," असे तुपकरांनी काही दिवसापूर्वी सांगितले आहे.

"स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जे घडत आहे, यामागे भाजप असल्याचा संशय आहे," असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com