Krishnaraj Mahadik : रवींद्र चव्हाणांच्या सल्ल्यानंतरही कृष्णराज महाडिकांचा आक्रमक पवित्रा! 'इथून पुढे जशास तसं उत्तर मिळणार!'

Ravindra Chavan advice to Krishnaraj Mahadik : रवींद्र चव्हाणांच्या सल्ल्यानंतरही कृष्णराज महाडिकांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला. ‘इथून पुढे जशास तसं उत्तर मिळणार’ या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
Ravindra Chavan advice to Krishnaraj Mahadik
Published on
Updated on

Krishnaraj Mahadik Latest News : माहीम मध्ये झालेल्या भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खंत व्यक्त केली. युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांनी नापसंती व्यक्त करत मला युवशक्तीला अडचणीत आणायचे नाही, आम्हाला युवकांना शिक्षित करायचे आहे.

गुंड म्हणून तयार करायचे नाही” असं रवींद्र चव्हाण म्हणाले. मुंबई कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर व्यासपीठावरून चव्हाणांनी युवा मोर्चाला सुनावलं होते. त्यावर कृष्णराज महाडिक यांनी प्रतिक्रिया देत इथून पुढे भाजपच्या युवा मोर्चांकडून जशास तसेच उत्तर दिले जाईल असे स्पष्ट केले.

Ravindra Chavan advice to Krishnaraj Mahadik
Manoj Jarange Patil : 'तुम्ही सरकारची बाजू घेताय का?' जरांगेंच्या थेट प्रश्नावर महिला जिल्हाधिकाऱ्यांचं धक्कादायक उत्तर, म्हणाल्या, फाशी घेण्याची वेळ आली तर...

कोल्हापूर विमानतळावर बोलत असताना कृष्णराज महाडिक यांनी, काल जे काही आंदोलन झालं त्याची सीसीटीव्ही पाहणी आम्ही केली. भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते शिस्त पद्धतीने मोर्चा करत होते. मात्र या मोर्चामध्ये मनसेचे चोर आले होते. पाठीमागून येऊन त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.मनसेच्या चोरांना भाजपच्या कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. यापुढे भाजपच्या कोणत्या कार्यक्रमात असे प्रकार केल्यास त्याला जसे तसे उत्तर मिळेल, असा इशारा कृष्णराज महाडिक यांनी दिला.

समाज माध्यमात होणाऱ्या टिके वर बोलताना, मी या गोष्टीकडे अधिक लक्ष देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदाचा जो अपमान केला याबाबत मी आवाज उठवला. अमित ठाकरेंनी संविधानाचा अपमान केला. पुण्यातील कॉलेजमधील घटना हे दुर्दैवी असल्याचे महाडिक म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करतो. देशांच्या पंतप्रधानांचा जेव्हा अपमान होतो. त्यावेळी तरुणांना राग अनावर होतो. तो राग व्यक्त करण्यासाठीच आम्ही तरुण एकत्र आलो होतो.आम्ही प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाचे पालन करत राहील. पण युवा मोर्चाचा राग आम्ही दाबून ठेवू शकत नाही. नवीन पिढी आहे. जे काही झालं त्यावर व्यक्त आम्हाला वाटतं. त्यामुळे जे काही झालं ते झालं. मी भाजपच्या सर्व नेत्यांना आश्वासित करतो की आमच्या आंदोलनामुळे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते तयार होणार नाहीत. यापूढे युवा मोर्चाचे पावले विवेक व विचारपूर्वक असतील, असेही कृष्णराज महाडिक म्हणाले.

Ravindra Chavan advice to Krishnaraj Mahadik
Maval Tahsildar News: मावळच्या 'महसूल' खुर्चीवरून युतीत जुंपली! सुनील शेळके की भाजप नेत्यांची मर्जी चालणार?

कृष्णराज महाडिक यांनी चुकीचा पक्ष निवडला, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्यावर बोलताना, भाजपा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. संजय राऊत यांनी भाजप पक्षाचा चुकीचा उल्लेख केला.आमच्या पक्षाची चिंता आम्ही करू यापुढे आम्ही योग्य वाटेने जाणार. संजय राऊत यांनी सल्ला देण्याची आवश्यकता नाही, असा टोलाही हाणला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com