Sugarcane FRP News : 'स्वाभिमानी'ची तडजोड रयत संघटनेला अमान्य; ऊसदरासाठी कराडला रास्ता रोको

Rayat Kranti Sanghatna सध्या कराड तालुक्यात ऊसदराचे आंदोलन पेटले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर आता रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे.
Rayat Kranti Sanghatna Andolan Karad
Rayat Kranti Sanghatna Andolan Karadsarkarnama
Published on
Updated on

-हेमंत पवार

Sugarcane FRP News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ३१०० रुपयांचा मान्य केलेला पहिला हप्ता आम्हाला मान्य नाही. यंदा पहिली उचल एफआरपी अधिक ५०० रुपये आणि मागील उसाचा दुसरा हप्ता ५०० रुपये मिळालाच पाहिजे, अशी मागणी करत रयत क्रांती संघटनेने आज रास्ता रोको आंदोलन केले. चार दिवसांत दर जाहीर न केल्यास कारखाने बंद पाडू, असा इशारा संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे यांनी दिला.

सध्या कराड तालुक्यात Karad Politics ऊसदराचे आंदोलन पेटले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर swabhimani Shetkari Sanghatna आता रयत क्रांती संघटना आक्रमक झाली आहे. आज रयत क्रांती संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले.

उसाला एफआरपी अधिक ५०० रुपये आणि मागील उसाचा दुसरा हप्ता ५०० रुपये मिळावा, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेने आज शुक्रवारी बनवडी फाट्यावर (ता. कऱ्हाड) आंदोलन केले. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

नलवडे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रशासनाशी तोडजोड करून शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या उसाला ३१०० रुपयांचा मान्य केलेला दर हा कमी आहे. यावर्षीच्या उसाला पहिली उचल ३५०० रुपये अधिक ५०० रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत.

Rayat Kranti Sanghatna Andolan Karad
Karad Political News : सर्वपक्षीयांनी मोदींवर दबाव टाकल्यास मराठा आरक्षण शक्य : पृथ्वीराज चव्हाण

त्याचबरोबर मागील वर्षी गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ५०० रुपये दुसरा हप्ता देणे आवश्यक आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मान्य केलेला दर हा आम्हाला मान्य नाही. साखर कारखानदारांनी चार दिवसांत ऊसदर जाहीर न केल्यास कारखाने बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

Edited By : Umesh Bambare

Rayat Kranti Sanghatna Andolan Karad
Satara Politics : शंभूराज देसाईंना टक्कर देण्यासाठी पाटणकरांचा नवा 'शुगरकेन'चा पर्याय...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com