Karad News : मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे व्यवहारिकदृष्ट्या योग्य होते. पण, पुढे आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला ते टिकवता आले नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले पाहिजे. त्यांच्यासमोर त्यासंदर्भातील योग्य मांडणी केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
आमदार पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्ताने फळाचे आयोजन केले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे व्यवहारिकदृष्ट्या योग्य होते; पण पुढे आलेल्या देवेंद्र फडणवीस Devendra Fadanvis यांच्या सरकारला ते टिकवता आले नाही.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मोठा आहे. त्यासाठी राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन पंतप्रधान मोदी यांना भेटले पाहिजे. त्यांच्यापुढे त्याची योग्य मांडणी केल्याशिवाय हा प्रश्न मिटणार नाही. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दिवाळीनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भेटले.
याबाबत चव्हाण यांना विचारले असता ते म्हणाले, पवारांचे घरातल्या घरात नेमकं काय चाललंय हे समजत नाही. त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विश्लेषण करणारा अजून जन्मायचा आहे. तुम्ही लोकसभा निवडणूक लढणार का, याबाबत विचारले असता चव्हाण म्हणाले, अजून आमच्या आघाडीत कोण कोणती जागा लढवणार हे निश्चित नाही. ते पहिल्यांदा ठरले पाहिजे . महाविकास आघाडीत जो निर्णय होईल, त्यावर पुढील दिशा ठरेल. Maharashtra Political News
विरोधकांची एकजूट गरजेची
राम मंदिर जरी बांधून झाले असले तरी त्याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतासाठी फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत नाही. म्हणूनच जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजप वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करीत आहे. सध्या देशात भाजप विरोधात वातावरण आहे. पण, त्याचा फायदा घेण्यासाठी विरोधकांची एकजूट तितकीच गरजेची आहे, अशी अपेक्षा आमदार चव्हाण यांनी व्यक्त केली.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.