Satara Politics : शंभूराज देसाईंना टक्कर देण्यासाठी पाटणकरांचा नवा 'शुगरकेन'चा पर्याय...

Vikramsinh Patankar Vs Shamburaj Desai News : "देसाईंचा एकमेव कारखाना असलेल्या पाटणमध्ये पाटणकरांचा नवा साखर कारखाना, शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवण्याची खेळी.."
Satara Politics
Satara PoliticsSarkarnama
Published on
Updated on

- विशाल पाटील

Satara (Patan) News : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात राष्ट्रवादीचा पाटणकर आणि शिवसेना शिंदे गटाचा देसाई गटात पारंपरिक राजकारण पाहायला मिळत आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याभोवती प्रत्येक निवडणुकीत उसाचं राजकारण आडवं आणलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देसाई गटावर केला जात आला आहे. (Latets Marathi News)

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या आजोबांच्या नावाने असलेल्या साखर कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी देसाई गटाच्या पाठीशी असल्याचे पाहायला मिळत आले आहे. आता राष्ट्रवादीचे नेते विक्रमसिंह पाटणकर यांनीही आता पाटण शुगरकेन उभारला असून, त्याचा पहिला रोलर पूजनाचा कार्यक्रम येत्या रविवारी दि. 26 रोजी दुपारी आयोजित केला आहे. त्यामुळे आगामी काळात देसाई- पाटणकर गटात उसाचं राजकारण पाटण तालुक्यात आणखी तीव्र पाहायला मिळणार आहे.

Satara Politics
Grampanchayat Election News : सातारा, जावळीत शिवेंद्रराजेंचाच डंका; सर्वच ग्रामपंचायतींवर वर्चस्व

पाटण तालुक्यात शिंदे शिवसेना गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे माजी बांधकाममंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यात राजकीय द्वंद नेहमीच पाहायला मिळाले. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटणकर यांना पराभवाचा धक्का बसला. पाटण तालुका विस्तारलेला असून, अनेक वर्षे पाण्याची वणवण असल्याने उसाचे पीक कमी प्रमाणात होते.

आता ुसाचे पीक वाढलेले असताना केवळ देसाई गटाचा लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना असल्याने ऊस उत्पादक शेतकरी पाटणकरांच्या विरोधात असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे पाटणकर गटाकडून ऊसगाळपासाठी साखर कारखान्यांची यंत्रणा उभारली जाणार असल्याचे अनेकदा निवडणुकीच्या तोंडावर म्हटले जात होते.

Satara Politics
Maratha Reservation : शंभूराज देसाईंनी सांगितली मराठा आरक्षणाची न्यायालयीन स्ट्रॅटेजी

पाटणकर गटाला यंत्रणा उभारण्यात उशीर होत असल्याने आणि यश येत नसल्याने अनेकदा कार्यकर्त्यांसह नेत्यांच्यात आरोप- प्रत्यारोप पाहायला मिळाले आहेत. परंतु, अखेर यंदा 26 नोव्हेंबरचा दुपारी 1 वाजताचा रोलर पूजनाचा मुहूर्त साधण्यात आला असल्याने उसाचे राजकारण पाटण तालुक्यात चांगलेच तापणार असल्याचा दावा अनेकांकडून केला जात आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यात एकहाती वर्चस्व देसाई गटाचे असून, सध्या मंत्री देसाई यांचे चिरंजीव यशराज देसाई हे कारखान्याचे चेअरमन आहेत. आता राष्ट्रवादीच्या पाटणकरांचा कवडेवाडी - पिंपळोशी येथे पाटण शुगरकेन सुरू करून उसाच्या राजकारणात आपल्याकडेही शेतकरी आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्नाला किती यश येते हे आगामी काळात कळेल. तरीही अजून उसाची पहिली मोळी टाकण्यासाठी जानेवारी- फेब्रुवारी उजडेल की पुन्हा पुढचा हंगामची वाट पाहावी लागेल, हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत रोलर पूजनाचा मुहूर्त पाटणकरांनी साधल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. 

Satara Politics
NCP Crisis News : राष्ट्रवादी कुणाची? दादांची की साहेबांची? आयोगासमोर आज सुनावणी; बोगस कागदपत्रे...

शेतकऱ्यांच्या उसाला जादा दराचे राजकारण -

मरळी (दाैलतनगर) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून ऊसदर समाधानकारक दिला जात नसल्याचाही आरोपही विरोधकांकडून केला जात होता. तसेच पाटणकर गटाच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचेही म्हटले जात होते. आता पाटण शुगरकेनमुळे पाटण तालुक्यात ऊसदरात स्पर्धा होईल अन् शेतकऱ्याला चांगला ऊसदर मिळेल, असा अंदाज बांधला जात आहे. तेव्हा आगामी काळात शेतकऱ्यांना दर मिळेल की नाही, शेतकऱ्याचा फायदा होईल की नाही हे कळेलच. परंतु, पारंपरिक देसाई आणि पाटणकर यांच्या गटात उसाचं राजकारण चांगलंच तापणार हे मात्र नक्की.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com