Solapur News : जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव यांना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेच्या अधिवेशनात तडकाफडकी निलंबित केले. आरोग्य अधिकाऱ्यांच्या निलंबनामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक तथा सोलापूरचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांचा हात असल्याचा गंभीर आरोप यावेळी सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांनी केला आहे. याबाबत आता काळजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काळजे यांनी आपली बाजू मांडताना म्हणाले, "जिल्हा आरोग्य अधिकारी शीतल जाधव यांचे निलंबन झाल्यानंतर त्यांनी आपल्यावरील रागातून आता संघटनांना पुढे करून आपली बदनामी सुरु केली आहे. मात्र आपण या बदनामीला घाबरणार नाही. आपण भ्रष्टाचाराची किड संपुष्टात आणली आहे. आपल्यावरील आरोपांचे पुरावे दिल्यास आपण कोणत्याही शिक्षेला सामोरे जाण्यास तयार आहोत. माझी प्रगती अनेकांना बघवत नसल्याने आणि राजकीय विरोधकांचा आधार घेऊन आपल्या विरोधात कुभांड रचण्यात येत आहे."
ते पुढे म्हणाले, "आपण केलेल्या चांगल्या कामाचे आतापर्यंत कौतुक झालेले आहे. आरोग्य अधिकारी जाधव यांच्या निलंबनाचे खापर जर आपल्यावर कोणी फोडत असेल तर आपण ते सहन करणार नाही. यापूर्वीचे सरकार शीतल जाधव यांना पाठीशी घालत असल्याने आणि आताचे सरकार जर त्यांना निलंबित करत असेल तर यातील फरक सर्वांनी ओळखला पाहिजे, " असेही काळजे म्हणाले.
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यामुळे सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला चांगले दिवस येत असताना, जाणीवपूर्वक यामध्ये आपली बदनामी करत खोडा घालण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्या विरोधात दबाव आणल्याचा एक जरी पुरावा कोणी दिला तर आपण म्हणेल त्या शिक्षेस पात्र राहू," असे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.