MNS Politics : मनविसेची पुनर्बांधणी रखडली; युवा पदाधिकारी सैरभैर...

Amit Thackeray MNS Politcs : अमित ठाकरे यांच्या नगरमधील दाैऱ्यानंतर मनविसेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर हाेणार, असे चित्र रंगवले गेले हाेते.
Amit Thackeray
Amit Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची कमान 'राज'पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे आहे. माेस्ट स्टायलिश पाॅलिटिशियन म्हणून अमित ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते. अमित ठाकरे जुलैमध्ये महासंपर्क दौऱ्यावर हाेते. या दाैऱ्यानिमित्ताने ते नगरमध्येदेखील येऊन गेले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची पुनर्बांधणी करणे हे या दौऱ्याचे लक्ष्य हाेते. त्यानुसार मनविसेच्या नगर कार्यकारिणीची पुनर्बांधणी हाेणार म्हणून युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह हाेता.

मात्र, अमित ठाकरे यांचा दाैरा हाेऊन आता दाेन - अडीच महिने झाले तरीदेखील मनविसेच्या नगर कार्यकरिणीची पुनर्बांधणी हाेत नसल्याने युवा कार्यकर्त्यांचा उत्साह मावळून राेष वाढू लागला आहे. यातून युवा कार्यकर्त्यांनी 'फादर बाॅडी'कडे बाेट दाखविण्यास सुरुवात केली आहे. पुनर्बांधणी होत नसेल, तर दाैरा नेमका कशासाठी हाेता, अशी कुजबूज कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.

Amit Thackeray
Dhananjay Munde News : ...तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही; धनंजय मुंडेंचा निर्धार, अतिवृष्टीचे अनुदान मिळवून देणार

अमित ठाकरे अहमदनगरमध्ये आले असताना कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह दिसून आला. अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी बंद खाेलीत संवाद साधला हाेता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मनविसे पुढील काळात आक्रमक भूमिका घेईल, अशी चर्चा हाेती. यासाठी मनविसेची पुनर्बांधणी निश्चितपणे हाेणार असे मानले जात हाेते. मनविसेच्या अहमदनगर कार्यकारिणीतील दिग्गजांना महाराष्ट्र पातळीवर संधी मिळणार, असेही खासगीत बाेलले जात हाेते.

अमित ठाकरे यांच्या नगरमधील दाैऱ्यानंतर मनविसेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर हाेणार, असे चित्र रंगवले गेले हाेते. नवीन संधी मिळणार म्हणून युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. काही कार्यकर्त्यांना पक्षात महाराष्ट्र पातळीवर काम करण्याची संधी मिळण्याची शक्यता होती. आज किंवा उद्या कार्यकारिणी जाहीर हाेईल, असे आजही वरिष्ठांकडून सांगितले जात आहे. परंतु दाेन ते अडीच महिने हाेऊन गेल्यानंतरही कार्यकारिणी जाहीर हाेत नसल्याने युवा कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला आहे.

अहमदनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 'फादर बाॅडी' आणि युवक पदाधिकाऱ्यांचे सूत जुळले नाही किंवा जुळवून घेतल्याचे दिसून आले नाही. नेहमीच वेगवेगळी भूमिका राहिली. आंदाेलनेदेखील वेगवेगळी झाली. अहमदनगर शहराच्या नामांतरावर मनविसे आक्रमक हाेती. त्यावेळी मनविसे कार्यकर्तेच आंदाेलन करायचे, परंतु मनसेचा सहभाग त्यात दिसून आला नाही.

अमित ठाकरे यांच्या दाैऱ्याच्या नियाेजनावेळी 'फादर बाॅडी' सक्रिय हाेती, पण त्यांच्यातील रुसवे-फुगवे लपून राहिले नाहीत. या सर्व गाेष्टी वरिष्ठ नेत्यांच्या नजरेतून सुटलेल्या नाहीत. त्यामुळे पक्षपातळीवर अहमदनगरचा विषय आल्यावर वरिष्ठ नेते नेहमीच सावध असतात. मनसेचे वरिष्ठ नेते पक्षप्रमुखांसमाेरदेखील अहमदनगरचा विषय लवकर घेत नाहीत, अशी चर्चा आहे.

मनसे आता लाेकसभा लढवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी अगोदर पक्ष संघटना मजबूत करण्याचा दृष्टीने मनविसेच्या पुनर्बांधणीवर कार्यवाही कधी हाेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Amit Thackeray
NCP Crisis : सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा; 'नाती जपण्यासाठी आम्ही सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न केला होता...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com