Adinath Sugar Factory : बंद पडलेल्या ‘आदिनाथ’साठी एक आमदार, दोन माजी आमदारांसह विक्रमी 272 उमेदवारी अर्ज दाखल

Karmala Political News : ज्या बागल कुटुंबाची आदिनाथ कारखान्यावर अनेक वर्षे सत्ता होती, त्या बागल कुटुंबातील एकही व्यक्तीने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे त्याची करमाळ्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे.
Narayan Patil-Sanjay Shinde-Jaywantrao Jagtap
Narayan Patil-Sanjay Shinde-Jaywantrao JagtapSarkarnama
Published on
Updated on

Karmala, 17 March : गेली अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी (सोमवार ता. 17 मार्च) आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्यासह 272 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. मात्र, ज्या बागल कुटुंबाची आदिनाथ कारखान्यावर अनेक वर्षे सत्ता होती, त्या बागल कुटुंबातील एकही व्यक्तीने निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही, त्यामुळे त्याची करमाळ्याच्या राजकीय क्षेत्रात चर्चा रंगली आहे.

करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना (Adinath Sugar Factory) आर्थिक कारणामुळे गेली अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. हा साखर कारखाना सुरू करण्याचे मोठे चॅलेंज समोर असतानाही 21 संचालकपदासाठी 272 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील हे सर्वाधिक अर्ज आहेत.

आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज सोमवारी (ता. 17 मार्च) शेवटचा दिवस होता, त्यामळे सर्चच गटातील कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी दहापासून तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.

दाखल उमेदवारी अर्जाची उद्या (मंगळवारी, ता. 18 मार्च) छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज दोन एप्रिलपर्यंत मागे घेता येणार आहेत, त्यामुळे माघारीपर्यंत सर्वांचे लक्ष असणार आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बंद असलेल्या कारखान्यावर कर्जाचा आणखी बोजा नको म्हणून कारखाना बिनविरोध करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला आहे, त्यामुळे त्यावर तालुक्यातील पुढारी एकत्र येतात का, हे पाहावे लागणार आहे.

Narayan Patil-Sanjay Shinde-Jaywantrao Jagtap
Vishwajeet Kadam : पतंगराव कदमांनी केलेलं तू फक्त टिकव म्हणजे झालं; अजित पवारांनी विश्वजित कदमांना भरसभागृहात सुनावले

आदिनाथ कारखान्यासाठी प्रा. रामदास झोळ, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, शंभूराजे जगताप, अमोल गाडगे, सुजित बागल, माजी संचालक दशरथ कांबळे, रमेश कांबळे, हरिदास केवारे, धुळाभाऊ कोकरे, प्रशांत पाटील, नवनाथ झोळ या प्रमुख नेतेमंडळींचे अर्ज आले आहेत.

कोणा कोणाचे अर्ज मंजूर होणार?

कारखान्याची निवडणूक लढवायची असेल तर पाचपैकी तीन वर्षे तरी ऊस गाळपाला आलेला असावा, असा नियम आहे. मागील पाच वर्षांत आदिनाथ काखान्याचे केवळ दोन हंगामात गाळप झालेले आहे. त्यातील एका हंगामात तर केवळ पाच हजार मेट्रीक टन ऊस गाळप करण्यात आलेला आहे, त्यामुळे पाच वर्षांत कारखान्याचे तीन गाळप हंगामच झाले नाहीत, त्यामुळे बहुतांश इच्छूक कारखान्याला ऊस घालू शकलेले नाहीत, त्यामुळे ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांचे अर्ज मंजूर होणार का, याविषयी उत्सुकता वाढली आहे.

Narayan Patil-Sanjay Shinde-Jaywantrao Jagtap
Budget Session : पटोलेंच्या ऑफरची अजितदादांनी उडविली खिल्ली; ‘तुमच्याकडं 15-20 टाळकी अन्‌ कशाचा पाठिंबा देताय?, ब्रह्मदेव आला तरी... ’

वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागितले आहे : निवडणूक निर्णय अधिकारी

यासंदर्भात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले म्हणाले, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज मंजूर करण्यासाठी कोणती नियमावली गृहीत धरायची, याबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागितले आहे. वरिष्ठ कार्यालयातून आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार निवडणुकीसाठी पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com