सोलापूर शिवसेनेतील पडझड थांबेना : अक्कलकोट तालुकाप्रमुख, शहरप्रमुखांसह आणखी १५ जणांचे राजीनामे

महाविकास विकास आघाडी सरकार असताना एकही कामे न झाल्याच्या आक्षेप घेत जिथे आमची कामेच सत्ता असताना झाली नाहीत, तिथे विरोधात असताना परिस्थिती काय असेल, असा आक्षेप या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
Sanjay Deshmukh-yogesh Pawar
Sanjay Deshmukh-yogesh PawarSarkarnama
Published on
Updated on

अक्कलकोट (जि. सोलापूर) : अक्कलकोट तालुक्यातील शिवसेना (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख संजय देशमुख (Sanjay Deshmukh) आणि शहर प्रमुख योगेश पवार (Yogesh Pawar) यांनी महाविकास विकास आघाडी सरकार असताना एकही कामे न झाल्याच्या आक्षेप घेत जिथे आमची कामेच सत्ता असताना झाली नाहीत, तिथे विरोधात असताना परिस्थिती काय असेल, असे सांगत शिवसेनेचा राजीनामा दिला. या दोघांनी आपले राजीनामे पक्षप्रमुख, जिल्हा प्रमुख व संपर्क प्रमुख यांच्याकडे शुक्रवारी (ता. २८ ऑक्टोबर) राजीनामे सादर केले आहेत. (Resignation of 15 office bearers including Shiv Sena's Akkalkot taluka pramukh, city chief)

दरम्यान, शनिवारी सकाळी तालुका उपप्रमुख प्रा. सूर्यकांत कडबगावकर यांनीही स्पष्ट केले की, आमची कोणतीच कामे झाली नाहीत, त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकलो नाही. त्याने निराश असून आज आम्ही महिला, व्यापारी, शिक्षक असे विविध विभाग प्रमुख यासह आणखी पंधरा पदाधिकारी राजीनामा देणार आहोत. या सर्व घडामोडीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शिवसेनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकूण ४० च्या आसपास पदाधिकारी येत्या दिवसांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडतील, अशी भूमिका संजय देशमुख यांनी मांडली आहे.

Sanjay Deshmukh-yogesh Pawar
‘अब्दुल सत्तार जिथे जातात तिथे गमती करतात; ते कृषीमंत्री नसून स्वखुशीमंत्री’

उद्धव ठाकरे यांची सत्ता जाऊन शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात चलबिचल सुरु होते. अखेर त्याचे परिणाम म्हणून संजय देशमुख व योगेश पवार यांचे राजीनामे दिले आहेत. आज आणखी १५ जणांनी पक्ष सोडून जाण्याचा निर्णय केल्याचे प्रा. कडबगावकर यांनी स्पष्ट केले.

Sanjay Deshmukh-yogesh Pawar
इंदापुरातून विजयाचा ढोल कोणाचा वाजणार...हर्षवर्धन पाटील, दत्तात्रेय भरणे की प्रवीण माने?

एकंदरीत सत्ता असताना आम्ही मोजकी मूलभूत सुविधांसंदर्भात पाच कामे वरिष्ठांना सांगितली होती, त्यातली एकही पूर्ण झाली नाहीत अथवा त्याची साधी चर्चादेखील झाली नाही, त्यामुळे आम्ही नाराज होऊन राजीनामे दिले आहेत. येत्या काळात ही सर्व कामे पूर्ण करण्याचा शब्द आम्हाला ठोस स्वरूपात मिळाला आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्धार केल्याचे तालुका प्रमुख संजय देशमुख यांनी सांगितले. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आता कोणते पदाधिकारी उरणार, याकडे लक्ष लागले आहे.

Sanjay Deshmukh-yogesh Pawar
Kailas Patil Hunger Strike : संतप्त शिवसैनिकांनी कलेक्टर ऑफीस गेटला लावले कुलूप; कलेक्टरांनाही दोन तास नो एन्ट्री!

नाराज पदाधिकारी यांचे आक्षेप

  • शासकीय विश्रामगृह नूतनीकरण विषय मार्गी न लावणे

  • कोणत्याही कार्यकर्त्यांना महत्वाचे पद न मिळणे

  • ट्रामा केअर सेंटरचा मांडलेला विषय दुर्लक्षित करणे

  • उजनी पाणीविषयी बैठक न बोलाविणे

  • पर्यटन निवास नूतन इमारत सुरु न करणे

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अक्कलकोटला येऊनही तालुका शिवसनेसाठी वेळ न देणे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com