Rohit Patil: अजितदादांचा आबांनी केसानं गळा कापल्याचा आरोप, रोहित पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले,'नऊ वर्षानंतर ही मळमळ...'

Ajit Pawar Alligations On R.R. Patil: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठी जाहीर प्रचारसभा घेतली. या सभेतून अजित पवारांनी आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप केला. अजित पवार म्हणाले, ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्याच आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
Ajit Pawar Rohit Patil
Ajit Pawar Rohit Patil sarkarnama
Published on
Updated on

Sangli News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून काही जागांचा घोळ वगळता आता जवळपास सगळंच जागावाटप निश्चित झालं आहे. यंदाची निवडणूक आघाडी आणि युतीने अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे आता आरोप- प्रत्यारोपांनी राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

यातच तासगांव येथील सभेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिवंगत आर. आर. पाटील यांनी केसानं गळा कापल्याचा सनसनाटी आरोप केला आहे. त्याला आता आर. आर. आबांचे सुपुत्र आणि तासगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.त्यामुळे आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

रोहित पाटील (Rohit Patil) म्हणाले, एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे,आबांना जाऊन साडेनऊ वर्ष झाली आहेत.ते हयात असते तर त्यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिलं असतं.पण गृहमंत्री म्हणून काम करताना आबांनी पारदर्शकपणे काम केलं. डान्सबार बंदींचं काम आबांनी केलं. पण आता इथले जे उमेदवार आहेत, त्यांची परिस्थिती मतदारसंघात चांगली नसल्यानं अजित पवार यांना तसं वक्तव्य करावं लागत आहे असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

'नऊ- साडेनऊ वर्षानंतर मळमळ...'

रोहित पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अजितदादांनी केलेल्या आरोपांवर पलटवार केला. ते म्हणाले,अजितदादा वयानं मोठे आहेत,त्यांनी एकेकाळी नेतृत्व केलं आहे. आम्ही देखील त्यांचं नेतृत्व स्वीकारत काम केलं आहे. आबांच्या पश्चात त्यांचं मार्गदर्शन होत असत.पण पक्षफुटीनंतर आदरणीय पवारसाहेबांचं आबांच्या जडणघडणीतील योगदान लक्षात घेता आबा असते तर तेही साहेबांसोबत उभे राहिले असते.

Ajit Pawar Rohit Patil
Teachers Constituency 2024: महाविकास आघाडीत फूट; शेवटच्या क्षणी काँग्रेसने 'या' ठिकाणी दिला उमेदवार

'...म्हणून आम्ही शरद पवारांसोबत!'

त्यामुळे आम्हीही त्यांच्यासोबत ताकदीनं उभं राहण्याचा निर्णय घेतला. मात्र,आजचं अजितदादांचं स्टेटमेंट आपण ऐकलं. माझे वडील जाऊन नऊ-साडे नऊ वर्ष झालेली असून त्यानंतर आता ही मळमळ बोलून दाखवली. यामुळे माझ्या कुटुंबीयांना दु:ख झालं आहे असल्याची भावना रोहित पाटलांनी बोलून दाखवली. तसेच सर्व कार्यकर्त्यांना दु:ख झालं असल्याचेही ते म्हणाले.

आबा प्रामाणिकपणानं, स्वच्छपणानं काम करत होते. गृहमंत्री असताना पारदर्शकपणे त्यांनी पोलीस भरती करुन घेतली. चांद्यापासून बांद्यापर्यंत चांगलं काम केल्याचा प्रत्यय लोकांना आहे. आबांच्या स्वच्छपणाला, पारदर्शकपणाला विरोध असेल तर माझं आणि माझ्या कुटुंबीयांचं दुमत असण्याचं कारण नाही. आबांनी गृहमंत्री म्हणून पारदर्शकपणे काम केलं, याचा आपल्याला अभिमान असल्याचं रोखठोक मतही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटलांनी व्यक्त केले.

Ajit Pawar Rohit Patil
Kolhapur Congress : काँग्रेसवर नामुष्की अन् सतेज पाटलांना धक्का; एकहाती नेतृत्वाची सत्वपरीक्षा...

अजितदादांचा नेमका आरोप काय..?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तासगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यासाठी जाहीर प्रचारसभा घेतली.या सभेतून अजित पवारांनी आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप केला. अजित पवार म्हणाले, ज्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. एवढं सहकार्य केलं. त्याच आर आर पाटील यांनी माझा केसाने गळा कापला होता, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

पवार म्हणाले, 70 हजार कोटी रुपयांचे घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर कारवाई करण्यासाठी फाईल गृह मंत्रालयाकडे गेली होती. त्यावेळी गृहमंत्री असणारे आर आर पाटील यांनी माझी खुली चौकशी करावी असे सांगत फाईलवर सही केली होती. त्यानंतर सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट लागू झाली. मात्र, माझ्या सहीवर राज्यपालांनी सही केली नाही.

सरकार बदललं 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री म्हणून कारवाई करण्यासाठी माझ्या फाईलवर सही केली. त्यावेळी फडणवीसांनी त्यांच्या बंगल्यावर बोलवत आर आर पाटील यांनीच तुमची खुली चौकशी करण्याचे आदेश देत सही केल्याचं मला दाखवून दिलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com