Kolhapur Congress : काँग्रेसवर नामुष्की अन् सतेज पाटलांना धक्का; एकहाती नेतृत्वाची सत्वपरीक्षा...

Kolhapur North Assembly Constituency: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकारणामुळे काँग्रेसची नामुष्की झालीच शिवाय काँग्रेसचे एक हाती नेतृत्व स्वीकारणाऱ्या सतेज पाटील यांच्या राजकीय वरदहस्ताला देखील धक्का पोहोचला आहे.
Satej Patil
Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: मोदी लाटेत काँग्रेस ढासळत असताना त्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यास कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांना यश मिळाले. जिल्ह्यात एक हाती नेतृत्व तयार झाले असताना राजव्यापी नेतृत्वाकडे झेप सुरू असताना त्यांच्याच स्वकीयांनी त्यांना मागे खेचण्याचे प्रयत्न केले आहे.

राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी वापरलेले राजीनामास्त्रमुळे सतेज पाटील यांना काही काळ मागे यावे लागले आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात घडलेल्या राजकारणामुळे काँग्रेसची नामुष्की झालीच शिवाय काँग्रेसचे एक हाती नेतृत्व स्वीकारणाऱ्या सतेज पाटील यांच्या राजकीय वरदहस्ताला देखील धक्का पोहोचला आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीकडून आठ आमदारांचे प्राबल्य या कोल्हापूर जिल्ह्यात होते. तर राष्ट्रवादीचे दोन आमदार असल्याने काँग्रेसला भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र 2019 च्या निवडणुकीत सतेज पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेसला नवी झळाळी मिळाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने झेंडा फडकवला. काँग्रेसला गत वैभव मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न सतेज पाटील यांनी केला. सत्ता स्थापना वेळी युती तुटल्यानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली. कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील (Satej Patil) यांच्या जोडीने महाविकास आघाडीचे नेतृत्व केले.

पालकमंत्री पदावर देखील सतेज पाटील यांनी मोहोर उमटवली. जिल्ह्यात चार विधानसभा निवडणुकीबरोबरच स्वतः जयंत पाटील आसगावकर यांना विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी सतेज पाटील यांची फिल्डिंग महत्त्वाची होती.

कोल्हापूर जिल्ह्यासह राजकीय स्तरावर त्यांच्या नेतृत्वाला चांगले महत्त्व प्राप्त झाले.महाविकास आघाडीतील पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. विधिमंडळातला गटनेता म्हणून देखील त्यांची नियुक्ती झाली.

Satej Patil
ShivSenaUBT: पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या तिघा माजी आमदारांना ठाकरेंच्या शिवसेनेची रसद?

अडीच वर्षांपूर्वी राज्यातील सत्तेत बदल झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील युवा पिढीला हाताशी धरून काँग्रेसचे केलेली बांधणी तितकीच महत्त्वाची ठरली त्याचा प्रत्येक लोकसभा निवडणुकीत आला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून (Shivsena) जागा काढून घेत काँग्रेस कडून कोल्हापूर लोकसभेत उमेदवार देण्यात आला. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सतेज पाटील यांचीच होती.

सांगलीमध्ये देखील त्यांची भूमिका महत्त्वाची होती. पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसला बळ दिल्यानंतर पाटील यांची वर्णी जागा वाटपाच्या समितीवर लागली. राज्यातील काँग्रेस उमेदवारांचे नाव निश्चित करण्यासाठी सतेज पाटील यांची झालेली नियुक्ती ही कार्यकर्त्यांना उभारी आणि ऊर्जा देणारी होती. अशातच विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावरून निर्माण झालेला पेच आपल्याच पत्त्यात पाडून घेतला.

काँग्रेसला ही जागा सुटल्यानंतर तीन दिवसांपूर्वी राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र काँग्रेस मधील इच्छुक असणाऱ्यांनी इतर नगरसेवकांना हाताशी धरून थेट राजेश लाटकर यांना विरोध करत राजीनामास्त्र वापरलं. काँग्रेस नगरसेवकांच्या या बंडामुळे राज्य नेतृत्व करत असलेल्या सतेज पाटील यांना काही काळ मागे यावे लागले.

शिवाय काँग्रेसला देखील उमेदवारी मागे घेण्याचे नामुष्की आली. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतील का? हे निकालांतीच पहावे लागेल.

Satej Patil
ShivSenaUBT: पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या तिघा माजी आमदारांना ठाकरेंच्या शिवसेनेची रसद?

काँग्रेस नेते सतेज पाटील या काँग्रेसच्या नगरसेवकांपुढे हतबल झाल्याचे दिसून आले. कोल्हापूर उत्तरमधून राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला झालेला निर्णय पाहून अंतर्गत गटबाजीत विखुरलेले काँग्रेसचे नगरसेवक एकत्र होताना पाहायला मिळाले.

एकीकडे यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला लाटकर कार्यकर्त्यांमधला आनंद, तर दुसरीकडे कोल्हापूर उत्तरमधून इच्छुक असलेले शारंगधर देशमुख आणि शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांमधील असंतोष पाहायला मिळाला.

बालेकिल्ला मिळवण्यात सतेज पाटील यशस्वी

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून आघाडी धर्म आणि स्वाभिमानी मुळे हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला आला नाही. मात्र गणपतराव पाटील यांच्या उमेदवारीनंतर सतेज पाटील यांनी केलेले प्रयत्न हा काँग्रेसचा बालेकिल्ला परत मिळवून देण्यासाठी झाला.

राज्यस्तरावर ठाकरे गटाने या मतदारसंघावर दावा केला असला तरी तो मतदारसंघ खेचून आणण्यासाठी सतेज पाटील यांचे प्रयत्न कमालीचे होते. हे देखील दिसून येते. एकीकडे केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाला भुरळ पाडणाऱ्या सतेज पाटलांना मात्र स्व‍कीयांनी मागे ओढले.

Satej Patil
Kolhapur Politics : ज्यांचा पराभव करत विधानसभेत एन्ट्री, त्यांच्याच लेकीसाठी आता सतेज पाटील राबणार

यंत्रणा आणि नियोजनामुळे करेक्ट कार्यक्रम

सतेज पाटील यांची अजिंक्यतारावरील यंत्रणा आणि नियोजन हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जलद मानले जाते. सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी त्यांनी उमेदवारी जाहीर होईपर्यंत नाव गुपित ठेवले होते. त्यांची यंत्रणा आणि नियोजन परफेक्ट ठरले होते. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव जवळपास अटळ होता.

मात्र काँग्रेसच्याच नगरसेवकांनी नाराजीची भूमिका घेतल्यानंतर त्यांच्या नियोजनाला देखील फटका बसला आहे. राजेश लाटकर यांच्या उमेदवारीत बदल झाल्यानंतर त्या ठिकाणी मधुरिमाराजे छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न कसे असणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com