रोहित पवारांनी मानले नितीन गडकरींचे आभार : या रस्त्यासाठी आला केंद्राकडून निधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांची भेट घेतली होती.
Rohit Pawar
Rohit Pawarsarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - केंद्र सरकार तर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून चाकण ते बीड असा रस्ता मंजूर झाला आहे. हा रस्ता जामखेड तालुक्यातून जातो. या रस्त्याचे काम सुरू व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) यांची भेट घेतली होती. आता या रस्त्यासाठी 157 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचे आभार मानले आहेत. ( Rohit Pawar thanked Nitin Gadkari: Funds came from the Center for this road )

चाकण ते बीड या रस्त्याच्या कामाचा निधी मंजूर झाल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार मानले. मात्र दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे आभार माननारे संदेश सोशल मीडियावर टाकले जात आहेत. या कामाचा प्रस्ताव डॉ. सुजय विखे पाटील यांनी तयार करून मंजुरीसाठी पाठविला होता. म्हणून हा प्रस्ताव मंजूर झाला आहे, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

Rohit Pawar
रोहित पवार गडकरींना भेटताच सुजय विखें म्हणाले मी पण प्रयत्न करतोय...

आमदार रोहित पवार यांनी 11 फेब्रुवारीला व त्यापूर्वीही एकदा या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही टाकली होती. त्यावेळी नितीन गडकरी यांना निवेदन देऊन रोहित पवार यांनी सविस्तर चर्चा केली होती. रोहित पवार यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, माझ्या मतदारसंघातील लोकांच्यावतीने केलेल्या विनंतीला मान देऊन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी साहेबांनी ‘चाकण-शिक्रापूर-न्हावरे-श्रीगोंदा-जामखेड-बीड’ या महामार्गातील जामखेड-सौताडा या टप्प्यासाठी 157.62 कोटी मंजूर केले. याबाबत गडकरी साहेब आपले मनापासून आभार!, असे ट्विटमध्ये म्हंटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com