Mushrif Counterattack On Rohit Pawar : रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायची आहे; हसन मुश्रीफांचा पलटवार

Kolhapur Politics : मला १९९८ मध्ये कुणाचा विरोध होता, हे जाहीरपणे सांगावे
Rohit Pawar-Hasan Mushrif
Rohit Pawar-Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आमदार रोहित पवार यांना तिकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा घ्यायची आहे. ते नवखे आहेत, एवढे धाडस ते कशासाठी करत आहेत, अशा शब्दांत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला. (Rohit Pawar wants to replace Ajitdad : Hasan Mushrif's counterattack)

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उद्या (ता. २५ ऑगस्ट) कोल्हापुरात सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला हेाता. त्याला उत्तर देताना मंत्री मुश्रीफ यांनी काही सवाल केले. ते म्हणाले की, कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार होते. आता का कमी झाले आहेत. पुण्यातदेखील अशी परिस्थिती झाली आहे.

Rohit Pawar-Hasan Mushrif
Dada Bhuse On Shivsena Split: शिवसेना का आणि कुणामुळे फुटली?; दादा भुसेंनी सांगितले खरे कारण...

कागल एमआयडीसीत माझा हस्तक्षेप वाढत आहे, असे रोहित पवारांचे म्हणणे असेल तर तिथल्या कारखानदारांना जाऊन विचारा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कागल एमआयडीसीत एक इंचही जागा शिल्लक नाही. त्यांनी अधिक माहिती घ्यावी. नोकऱ्या आमच्या भुमिपुत्रालाच मिळणार ना. कारण त्यांच्या जमिनी गेल्या आहेत. कोणता लोकप्रतिनिधी तसे प्रयत्न करणार नाही. आरोप करायला जागा नसल्याने ते असे आरोप करत आहेत, अशी टीकाही रोहित पवार यांच्यावर मुश्रीफ यांनी केली.

Rohit Pawar-Hasan Mushrif
Rohit Pawar News : जयंतराव शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच..; रोहित पवारांनी संजयकाकांना खडसावले ; म्हणाले, 'सांगलीच्या लोकल नेत्यांकडे लक्ष देऊ नका,'

कोल्हापूरमधून विरोध असूनही शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना उमेदवारी दिली, असेही रोहित पवार यांनी म्हटले हेाते. त्याला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले की, मला १९९८ मध्ये कुणाचा विरोध होता, हे जाहीरपणे सांगावे. सदाशिवराव मंडलीक साहेब तर माझे नेते होते, त्यांचा तर मला विरोध नव्हता. मग कुणाचा विरोध होता, हे त्यांनी जाहीरपणे सांगावे. शरद पवार यांच्यामुळे आम्हाला राजकारणात स्थान मिळाले, हे आम्ही कधी नाकारणार नाही.

Rohit Pawar-Hasan Mushrif
Mohol Politics : रमेश कदमांच्या सुटकेने मोहोळची समीकरणे बदलणार; पाटील विरुद्ध पाटील पुन्हा रंगणार सामना?

शरद पवार यांना एवढ्या छोट्या मैदानात आणायला नको होते. त्या दसरा मैदानात जास्तीत जास्त पाच हजार लोक बसू शकतील. पवारांची सभा ऐकायला सांगली, इस्लामपूरमधून लोक येणार. साहेब काय बोलतात, हे बघायला येणार. काही आमची माणसं ऐकायला जाणार. त्यांच्या सभेला गर्दी व्हावी, या आमच्या शुभेच्छा आहेत, असे हसन मुश्रीफ यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com