Dada Bhuse On Shivsena Split: शिवसेना का आणि कुणामुळे फुटली?; दादा भुसेंनी सांगितले खरे कारण...

Dada Bhuse News : त्याकाळी आम्ही शिवसेनेतील २० ते २५ आमदारांनी प्रयत्नही केले होते. मात्र, पक्षातीलच नारदमुनींमुळे त्याला यश आले नाही.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political News: शिवसेना पक्ष आमचा कौटुंबीक परिवार होता. घरातील वाद घरातच सुटायला पाहिजे होता. मात्र, काही नारदमुनींमुळे त्याला यश आले नाही, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल, असे परखड मत राज्याचे खणीकर्म व बंदरे मंत्री दादा भुसे यांनी स्पष्टपणे सांगितले. (Why Shiv Sena split and because of whom; Dada Bhuse said the reason...)

शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना ठाकरे गटावर टीका करताना म्हटले की, शिवसेना आमचा कौटुंबीक परिवार होता. परिवारात वाद होत असतात, ते परिवारातच सुटत असतात. त्या प्रमाणे शिवसेनेत अंतर्गत वाद होते, ते परिवाराच्या माध्यमातून सुटण्याची गरज होती, त्यासाठी त्याकाळी आम्ही शिवसेनेतील २० ते २५ आमदारांनी प्रयत्नही केले होते. मात्र, पक्षातीलच नारदमुनींमुळे त्याला यश आले नाही, त्यामुळे शिवसेना पक्षात फूट पडली.

Dada Bhuse
Mohol Politics : रमेश कदमांच्या सुटकेने मोहोळची समीकरणे बदलणार; पाटील विरुद्ध पाटील पुन्हा रंगणार सामना?

कांद्या प्रश्‍नाबाबत दादा भुसे यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लावले. त्यापूर्वी कांद्याला जोर भाव होता, तोच भाव देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. कांद्याला या पूर्वी दीड ते अडीच हजार रूपये भाव मिळत होता, त्यामध्ये शेतकरी समाधानी होता, त्यामुळे तोच दर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Dada Bhuse
Rohit Pawar News : जयंतराव शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच..; रोहित पवारांनी संजयकाकांना खडसावले ; म्हणाले, 'सांगलीच्या लोकल नेत्यांकडे लक्ष देऊ नका,'

याशिवाय, केंद्र सरकारनेच कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार तब्बल दोन लाख क्विंटल कांदा खरेदी करणार आहे. कमी प्रमाणात खरेदी होत आहे, असे वाटत असले पुढील काळात सरकार ही खरेदी वाढविणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी समाधानी आहेत, असा दावाही दादा भुसे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com