निवडणूक लांबणीवर गेली अन्‌ शेकापचा घात झाला; दोन माजी नगराध्यक्षांचा पराभव

खालापूर नगरपंचायतीची निवडणूक लांबवणीवर गेल्याचा फायदा शिवसेनेला झाला.
pwp party
pwp partysarkarnama
Published on
Updated on

खालापूर (जि. रायगड) : नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर खालापुरात शिवसेना (shivsena) सर्वात मोठा पक्ष असल्याचे पुढे आले आहे. खालापूर नगरपंचायतीची ही दुसरी सार्वत्रिक निवडणूक होती. मागील निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने (pwp party) एकहाती विजय मिळवला होता. पाच वर्ष सत्तेत असताना शेकापने विकासकामांचा धडाका लावला होता. त्यामुळे शेकापला ही निवडणूक सोपी जाणार असे मानले जात होते. पण, वर्षभर निवडणूक लांबणीवर गेल्याचा फटका शेकापला बसला, तर शिवसेनेला त्याचा फायदा झाला. (Shiv Sena benefited from postpone of Khalapur Nagar Panchayat elections)

आमदार महेंद्र थोरवे आणि राज्यातील सत्ता यामुळे शिवसेनेने खालापूर नगरपंचायत हद्दीत विकास कामासाठी निधी आणण्याचा धडाका लावला होता. नगरपंचायत प्रभाग आरक्षणचा प्रभावदेखील निवडणुकीत जाणवला. शेकाप स्वबळावर लढला, तर शिवसेना या वेळी नगरपंचायतीच्या चौदा प्रभागांत राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन लढली. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मर्यादित ताकदीचा विशेष फायदा झाला नसला तरी वणवे प्रभाग सहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या विजयात शिवसेनेचा मोठा वाटा होता.

pwp party
भाजप नगरसेवकाच्या खूनप्रकरणातील प्रमुख आरोपीचे झळकले फ्लेक्स!

सतरा जागांपैकी शिवसेना आठ जागा जिंकून बहुमतापासून एक जागा दूर आहे. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला केलेली मदत सत्तेचे समीकरण जुळविताना शिवसेनेला उपयोगी पडणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस यांचे अस्तित्व या निवडणुकीत जाणवले नाही. भारतीय जनता पक्षाच्या तीन उमेदवारांनी घेतलेल्या मताचा फटका शेकाप आणि शिवसेना उमेदवारांना बसला आहे. शेकापला मागील निवडणुकीपेक्षा तीन जागा कमी मिळाल्या, तर शिवसेनेच्या तीन जागा वाढल्या. शेकापला प्रभाग पाच दांडवाडी, सहा वणवे, सात पाटील आळी आणि अकरा चाळके आळी या जागा कायम ठेवण्यात अपयश आले. शिवसेनेच्या वाढलेल्या तीन जागा त्या प्रभागात उमेदवाराचा असलेला जनसंपर्क विजयापर्यंत घेऊन गेला.

pwp party
बायको सोडून गेली अन्‌ गाव मला ‘मोदी’ म्हणू लागले : पटोलेंचा ‘गावगुंडा मोदी’ अखेर प्रकटला!

शेतकरी कामगार पक्ष या वेळी स्वबळावर लढला. पण, काही ठिकाणी दुरावलेले कार्यकर्ते आणि मागील निवडणुकीसारखा प्रचाराचा धडाका न ठेवता आल्याने शेकापला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. शिवसेनेच्या प्रचाराची धुरा आमदार महेंद्र थोरवे यांनी ज्येष्ठ नेते आणि खालापूरशी नाळ जुळलेले नवीनचंद्र घाटवळ यांच्याकडे सोपवली होती. शिवाय माजी तालुका प्रमुख उमेश गावंड यांच्या नियोजनाचाही फायदा शिवसेनेच्या तीन जागा वाढण्यात झाला आहे.

pwp party
आदित्य ठाकरेंच्या धडाडीच्या निर्णयाने वाचला २०० वर्षे जुना वटवृक्ष!

दोन माजी नगराध्यक्षांचा पराभव

या निवडणुकीत दोन माजी नगराध्यक्षांना नवख्या उमेदवारांकडून पराभव स्वीकारावा लागला. यामध्ये प्रभाग बदलाचा फटका दोघांना बसला आहे. शेकापचे माजी नगराध्यक्ष दिलीप वामन कातकरी या वेळी भाजपकडून प्रभाग तेरामधून निवडणूक लढवत होते. शेकापच्या महेश लक्ष्मण पवार यांनी त्यांचा पराभव केला. तर प्रभाग आठमधून शेकापच्या माजी नगराध्यक्षा गुलाब वाघमारे यांना शिवसेनेच्या महेश जाधव यांनी पराभूत केले.

pwp party
बहुमत मिळूनही नीलेश लंकेंनी आणले आणखी दोन नगरसेवक

शिवसेनेने मिळविली सर्वाधिक मते

शिवसेनेनी चौदा प्रभागांत निवडणूक लढवली, सर्व उमेदवारांना सर्वाधिक एकूण १८८२ मते मिळाली. त्या खालोखाल शेकापने पंधरा प्रभागात निवडणूक लढवत १६०१ मते घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच प्रभागात उमेदवार उभे होते. त्यांना ५१३ मते, तर भाजपच्या सात मतदारसंघातील उमेदवारांना एकूण ३२३ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चार प्रभागांत उमेदवार उभे केले होते, त्यांना १०७ मते, तर काँग्रेस पक्षाचा एकाच प्रभागात उमेदवार होता, त्याला केवळ १६ मते मिळाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com