बाजार समितीच्या संचालकांसाठी 'गुड न्यूज' : तीन महिन्यांच्या मुदतवाढीचा बोनस

संचालक होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांना आणखी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.
Market Committee
Market Committeesarkarnama
Published on
Updated on

मंगळवेढा (जि. सोलापूर) : राज्यातील बाजार समितीच्या (Market Committee) विद्यमान संचालक मंडळांना राज्य सरकारने खूशखबर दिली आहे. सध्याच्या संचालक मंडळास तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा आदेश राज्याचे सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव डॉ. सुग्रीव धपाटे यांच्या सहीने काढण्यात आला आहे. (Extension of three months to the Director of Market Committee)

दरम्यान, जुन्याच संचालक मंडळांना मुदतवाढ मिळाल्याने संचालक होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक कार्यकर्त्यांना आणखी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे.

Market Committee
निवडणूक लांबणीवर गेली अन्‌ शेकापचा घात झाला; दोन माजी नगराध्यक्षांचा पराभव

याबाबत परभणी जिल्ह्यातील जिंतूर बाजार समितीच्या मतदार यादीवर आक्षेप घेत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली होती. त्यबाबत देण्यात आलेल्या आदेशात बाजार समितीच्या निवडणुका घेण्यापूर्वी अगोदर गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या निवडणुका घेण्याचे म्हटलेले आहे. त्यानुसार जोपर्यंत गावातील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका होत नाही; तोपर्यंत बाजार समितीच्या निवडणुका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळांना २३ जानेवारीपासून पुढील तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे.

Market Committee
भाजप नगरसेवकाच्या खूनप्रकरणातील प्रमुख आरोपीचे झळकले फ्लेक्स!

मुदतवाढीच्या काळात बाजार समितीच्या संचालकांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. तथापि विशिष्ट परिस्थितीत धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल, तर राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेणे आवश्‍यक असणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पुण्याचे पणन विभागाचे संचालक यांच्यामार्फत राज्य सरकारला पाठविण्यात येणार आहे, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

Market Committee
बायको सोडून गेली अन्‌ गाव मला ‘मोदी’ म्हणू लागले : पटोलेंचा ‘गावगुंडा मोदी’ अखेर प्रकटला!

या निर्णयामुळे राज्यभरासह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, अकलूज, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, माढा, अक्कलकोट या बाजार समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित झाली आहे. या निवडणुका 16 डिसेंबर ते 17 जानेवारी या कालावधीत घेण्याचे निश्‍चित केले होते. त्यानुसार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरु होती. प्रारुप मतदार याद्यांवर हरकती मांडण्यात आल्या होत्या. परंतु कोरोनामुळे महाराष्ट्र कृषी पणन अधिनियम 1963 कलम 59 मधील तरतुदींनुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com