गट-गण आरक्षण सोडती पाठोपाठ नगर जिल्ह्यात अफवांचे पेव

अहमदनगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 14 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काल ( गुरुवारी ) आरक्षण सोडत काढण्यात आली.
Ahmednagar ZP
Ahmednagar ZPSarkarnama
Published on
Updated on

अहमदनगर - अहमदनगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 14 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काल ( गुरुवारी ) आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडती पाठोपाठ जिल्ह्यात राजकीय अफवांचे पेव फुटले आहे. ( Rumors abound in Nagar district following group-gana reservation draw )

कोण कोणाची व केव्हा कशी खिल्ली उडवेल, हे सांगता येत नाही. सध्या राजकीय वर्तुळात सगळीकडे एकमेकांची खेचाखेची सुरु आहे. त्यातच आज जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रियेनंतर इच्छुकांची बनावट संदेश करून अफवांचे पसविल्या. या अफवांचे पेवामळे काहींचे अभिनंदनही कार्यकर्त्यांनी केले. मात्र प्रत्यक्षात ते आरक्षण नसल्याचे सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर हिरमोडही झाला.

Ahmednagar ZP
गडाख, भांगरे, जगताप, शेलार, राऊत, परजणे, वाकचौरेंसह अनेक दिग्गजांना फटका

जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण सोडण्याची प्रक्रिया पार पडली. ही प्रक्रिया सुरु झाल्यानंतर आरक्षण काय निघाले याची माहिती आपल्या प्रतिनिधींकडून मिळाल्यानंतर काहींनी आपल्या प्रतिस्पर्धीची खेचण्यासाठी कार्यकर्त्यां मार्फत चुकीचं संदेश करून समाज माध्यमावर व्हायरल केली. प्रशासनाकडून आरक्षणाची यादी प्रसिध्द होण्याच्या आतच काहींनी ती समाज माध्यमावर व्हायरल केली. त्यामुळे जिल्ह्यात अफवांचे पेव फुटले होते. परंतु यामध्ये काहींना शंका आल्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर ही अफवाची बाब समोर आली. त्यानंतर मात्र काहींचा चांगलाच हिरमोड झाला.

या बाबीची माहिती प्रशासनाला झाल्यानंतर प्रशासनाने पुन्हा आपल्याकडून प्रसिध्द झालेल्या यादीची पडताळणी करून घेतली. त्यानंतर समाज माध्यमावर व्हायरल झालेली यादी ही बनावट असल्याचे त्यांचाही लक्षात आले. जिल्हा परिषद व पंचायत समितीतसाठी आरक्षणची प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेमुळे इच्छुकांची धाकधूक आता संपली आहे. निवडणुकीस इच्छूक असलेल्यांची आता मोर्चेबांधणी सुरु होणार आहे. आरक्षणाचे फासे उलटे पडल्यानंतर आता काहींनी आरक्षीत जागेवर आपल्याच मर्जीतील व विश्वासू व्यक्तींना उभे करून निवडणुकीत प्रतिस्पर्धी गटाला आव्हान देण्याचा निश्चय अनेकांनी केलेला आहे.

Ahmednagar ZP
सुनील गडाखांना घरी बसण्याची वेळ : आरक्षणामुळे नेवाशात 'महिलाराज'

आरक्षीत जागांवर आलाच उमेदवार उभा करून गट व गणावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या हालचाली सुरु झालेल्या आहेत. काहींनी तर आता गट आरक्षीत झाला तर कुटुंबियातील व्यक्तींना गणात उभे करून गटात आपले प्रस्त कायम ठेवण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येते की अपयश हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषदेची जागा गेली म्हणून काहीजण घरातील व्यक्तींना पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरविण्याची तयारी सुरु केलेली आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून गटात संपर्क ठेवण्याचा हा प्रत्येक नेत्याचा प्रयत्न यातून दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com