त्रास झाला असेल तर तक्रार करा मग चौकशीचं बघू! चाकणकरांनी नवनीत राणांना सुनावलं

रुपाली चाकणकर यांची खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर टीका
Rupali Chakankar, Navneet Rana
Rupali Chakankar, Navneet Ranasarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिले नाही, असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला होता. त्यावरुन आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी नवनीत राणा यांच्यावर जोरदार टिका केली.

रुपाली चाकणकर आज (ता.२२) पंढरपूर दौऱ्यावर होत्या. यावेळी चाकणकर म्हणाल्या, नवनीत राणा यांना पोलिसांकडून आणि राज्य सरकारकडून काही त्रास झाला असेल, तर त्यांनी राज्य महिला आयोगाकडे तशी तक्रार द्यावी. त्यामध्ये तथ्य असेल तर निश्चित त्याची दखल घेऊ असे, चाकणकर यांनी स्पष्ट केले.

Rupali Chakankar, Navneet Rana
नाना पटोले म्हणाले, केंद्र सरकारने इंधनावरील कमी केलेले कर ही निव्वळ धुळफेक !

कोरोनानंतर आता कोठे महाराष्ट्र सावरतो आहे. राज्यापुढे महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक मुद्दे आहेत. भोंगा, हुनुमान चालीसा हे सर्व सामान्य जनतेचे प्रश्न नाहीत. तुम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाच्या आवारात बसून कायदा सुव्यवस्थाच धोक्यात आणायचा स्वत: प्रयत्न करता, असेही चाकणकर म्हणाल्या.

Rupali Chakankar, Navneet Rana
मोदींनी आमंत्रण स्वीकारले! देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच येणार देहूत

महाराष्ट्र सध्या शांत आहे. त्यामुळे काहींना महाराष्ट्र अशांत कराचा आहे, ही विकृत मोनोवृती आहे, असा घाणाघाती आरोप राणा दांपत्यांवर व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या केतकी चितळे हिच्यावरुन केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com