Rupali Chakankar : 'हे' नीच पातळीच किळसवाण विधान, आता सोडणार नाही... रूपाली चाकणकरांनी दिला थेट कायदेशीर कारवाईचा इशारा

Anjali Damania on Parth Pawar : अंजली दमानिया यांच्या आरोपांवर रूपाली चाकणकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत पार्थ पवार यांच्या बदनामीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
Rupali Chakankar addresses the media in Pune, condemning Anjali Damania’s remarks on Parth Pawar and announcing possible legal action.
Rupali Chakankar addresses the media in Pune, condemning Anjali Damania’s remarks on Parth Pawar and announcing possible legal action.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचं खारगे समितीनं म्हटलं असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सर्व शक्यता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फेटाळून लावत पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या विरोधात आता थेट अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

रूपाली चाकणकर म्हणाल्या, अंजली दमानिया यांची आजची विधन ऐकल्यानंतर समाजात किती खालच्या पातळीची विकृती असू शकते हे पाहायला मिळत आहे. अंजली दमानिया यांना कपोल-कल्पित गोष्टी सांगण्याची सवय आहे. आणि त्याद्वारे त्या एखाद्या व्यक्तीची आणि कुटुंबाची सतत बदनामी करत असतात. यापूर्वी देखील दमानिया यांनी अजितदादांवर खूप सारे आरोप केले. मात्र त्यातील एकही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत.

Rupali Chakankar addresses the media in Pune, condemning Anjali Damania’s remarks on Parth Pawar and announcing possible legal action.
Anjali Damania : नाशिकच्या तपोवनात अंजली दमानियांची एण्ट्री, पहिला घाव गिरीश महाजनांवर

आता अंजली दमानिया या अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर टीका करत आहेत. त्या कुटुंबाने आपला घरातला व्यक्ती गमावला आहे आणि सबंध महाराष्ट्र त्याबाबत हळहळ व्यक्त करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मुलावरतीच वडिलांच्या घातपाताचा आरोप अंजली दमानिया करत आहेत. हे नीच पातळीचे आणि किळसवाण विधान आहे.

Rupali Chakankar addresses the media in Pune, condemning Anjali Damania’s remarks on Parth Pawar and announcing possible legal action.
NCP Pune : पुण्यात शरद पवारांनी शोधली प्रशांत जगतापांची रिप्लेसमेंट : ऐन महापालिका निवडणुकीदरम्यानच शहराध्यक्षांची नियुक्ती

खरगे समितीचा अहवाल येण्यापूर्वीची काही विधाने आणि विमान अपघाताबाबतचा तपास सुरू असताना केली जाणारी विधाने त्या कोणताही पुरावा न देता करत आहेत. अशी विधानं करून सातत्याने चर्चेत राहण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. मात्र हा अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं रूपाली चाकणकर यांनी सांगितला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com