Ruturaj Patil vs Mahadik : पाटलांच्या ‘प्रगती’ला ‘ऋतू बदलू’या म्हणत महाडिकांकडून ‘दक्षिण प्रोब्लम’ची पोस्टरबाजी

Ruturaj Patil vs mahadik kolhapur Politics : काँग्रेसचे नेते ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे नेते माजी आमदार अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक असा हा सामना रंगणार आहे.
Ruturaj Patil mahadik kolhapur Politics
Ruturaj Patil vs mahadik kolhapur Politics Sarkarnama
Published on
Updated on

राज्यातील सर्वात लक्षवेधी ठरत असलेली विधानसभा निवडणूक म्हणजे कोल्हापुरातील दक्षिण विधानसभा मतदारसंघ. एकमेकांचे राजकीय कट्टर विरोधक पाटील आणि महाडिक गटाची कुस्ती पुन्हा या मैदानात गाजणार आहे. विद्यमान आमदार आणि काँग्रेसचे नेते ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपचे नेते माजी आमदार अमल महाडिक किंवा त्यांच्या पत्नी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक असा हा सामना रंगणार आहे.

तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या उपनगरातील दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काही भाग आणि ग्रामीण भागात आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांचे माहिती देणारा आणि एकूण निधी असलेले पोस्टर ठीक ठिकाणी लावले आहेत. तर महाडिकांकडून विकास निधीच्या पोस्टरला आव्हान देत मतदारसंघातील समस्या हेरून 'दक्षिण प्रॉब्लेम' ह्या टॅगलाईन खाली मतदारसंघात पोस्टर झळकले आहेत. त्यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वातावरण हळूहळू तापायला सुरुवात झाली आहे. इतकेच नव्हे तर समाज माध्यमात देखील विकास निधीच्या पोस्टरवरून पाटील गटाला घेरण्याची व्यूहरचना महाडिक (Dhananjay Mahadik) गटाने आखली आहे.

Ruturaj Patil mahadik kolhapur Politics
Abhijeet Patil : अभिजीत पाटील पोचले थेट ‘सिल्व्हर ओक’वर; अवघ्या तीन दिवसांत पवारांना दुसऱ्यांदा भेटले

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. मतदारापर्यंत यापूर्वी केलेल्या विकास कामांची माहिती पोहोचवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धांदल उडाली आहे. प्रचाराचे अनेक फंडे वापरत इच्छुक आपल्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा ध्येय ठेवत आहे. कोल्हापुरातील कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात हीच परिस्थिती आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी देखील मतदारसंघात आपण केलेल्या विकास कामाचा लेखाजोखा मांडत अनेक ठिकाणी पोस्टर लावले आहेत. शहरा लगत असणाऱ्या उपनगरात आणि ग्रामीण भागात चौका चौकात आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांनी हे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरला महाडिक गटाने आव्हान देत ज्या त्या गावातील परिस्थिती लोकांसमोर दक्षिण प्रॉब्लेम या टॅगलाईन खाली दाखवली आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघात चाललेलं हे पोस्टर वॉर मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

Ruturaj Patil mahadik kolhapur Politics
Kagal Assembly Election 2024: राजकारणाची धग पोहोचली कुटुंबापर्यंत ! कागलच्या जागेवरून बाप-लेकामध्ये मतभेद

महाडिक गटाकडून करण्यात आलेल्या पोस्टरबाजीमुळे आमदार ऋतुराज पाटील यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करण्यात आली आहे. विरोधकाने आणलेला नेमका निधी गेला कुठे? असा सवाल या पोस्टर मधून करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पाटील गटाकडून पोस्टर लावण्यात आले आहेत, त्याच्या बाजूलाच किंवा समोर महाडिक गटाची पोस्टरबाजी दिसून येत आहे. 'समस्यांचा ऋतू बदलूया, प्रगतीचे कमळ फुलवूया', असे आशय पोस्टरवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com