Abhijeet Patil : अभिजीत पाटील पोचले थेट ‘सिल्व्हर ओक’वर; अवघ्या तीन दिवसांत पवारांना दुसऱ्यांदा भेटले

Madha Assembly Constituency : मुलाखतीनंतर अवघ्या तीन दिवसांत अभिजीत पाटील यांनी पुन्हा शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे माढ्यातून अभिजीत पाटील यांची उमेदवार निश्चित होते का, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Abhijeet Patil-Sharad Pawar
Abhijeet Patil-Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 11 October : पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आज (ता. ११ ऑक्टोबर) पुन्हा शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवारांच्या भेटीसाठी पाटील यांनी थेट सिल्व्हर ओक गाठले. त्या ठिकाणी शरद पवार आणि पाटील यांच्यात चर्चा झाली. अभिजीत पाटील यांना माढ्यातून तुतारीची उमेदवारी हवी आहे, त्यामुळे ते महायुतीला विशेषतः भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

माढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी आज थेट सिल्व्हर ओक या ठिकाणी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. तत्पूर्वी पाटील यांनी मंगळवारी (ता. 08 ऑक्टोबर) पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. पुण्याच्या निसर्ग मंगल कार्यालयात अभिजीत पाटील यांनी माढ्याच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केली आहे.

मुलाखतीनंतर अवघ्या तीन दिवसांत अभिजीत पाटील यांनी पुन्हा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे माढ्यातून अभिजीत पाटील यांची उमेदवार निश्चित होते का, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आता माढ्यातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून नेमकं कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याची उत्सुकता वाढली आहे.

Abhijeet Patil-Sharad Pawar
Rajan Patil-Umesh Patil : राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव हेच आमचे टार्गेट; उमेश पाटलांनी रणशिंग फुंकले

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाल्यानंतर अभिजीत पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली होती. महायुती सरकारकडून कारखान्याला मदत झाल्यानंतर अभिजीत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत जाणे पसंत केले होते. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यालाही केंद्र सरकारकडून नुकतेच 280 कोटी रुपयांचं कर्जही उपलब्ध झाले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील यांनी पुन्हा शरद पवार यांच्याशी संवाद वाढवला आहे. अवघ्या तीन दिवसांत अभिजीत पाटील यांनी शरद पवारांची दोन वेळा भेट घेतली आहे. माढ्यातून ते महाविकास आघाडीकडून विधानसभेची निवडणूक लढवू इच्छित आहेत, त्यामुळे माढ्यातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी मिळू शकते.

Abhijeet Patil-Sharad Pawar
Karmala Politics ; संजय शिंदेंच्या कार्यपद्धतीवर नारायण पाटलांचा हल्लाबोल; ‘मीच करमाळ्याचा सर्वस्व अन मी सांगेल तीच पूर्वदिशा’

अभिजीत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुलाखतीच्या निमित्ताने शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती. आता त्यांनी थेट सिल्व्हर ओक गाठत पवारांची भेट घेतली आहे, त्यामुळे अभिजीत पाटील हे महायुतीची साथ सोडणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com