Sadabhau Khot On NCP : राज्य सरकारला सोडलं अन् सदाभाऊंनी शरद पवार - रोहित पवारांविरोधात काढला गळा...

Sadabhau Khot On Sugarcane Dispute : "शरद पवार हे बडे मिया आणि छोटे मिया रोहित पवार आहेत."
Sadabhau Khot
Sadabhau Khot Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी ऊस निर्यात बंदीवरून राज्य सरकारवर मेहरबानी दाखवून थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार रोहित पवार यांच्याविरोधात गळा काढला आहे. ऊस निर्यातीचा निर्णय रद्द केल्याबद्दल सरकारचे आभार मानून निर्यातबंदीच्या निर्णयाचे खापर कारखानदारांवर फोडले आहे. (Latest Marathi News)

(राजकीय घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी 'सरकारनामा'चे व्हाट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

Sadabhau Khot
BJP Lok Sabha Strategy : मंत्रिपदाची अपेक्षा करू नका, लोकसभेच्या तयारीला लागा; सर्व आमदारांना भाजप हाय कमांडचे आदेश ?

"शरद पवार हे बडे मिया आणि छोटे मिया रोहित पवार आहेत. रोहित पवार हे नव्या पिढीचे अभ्यासक-विचारवंत असल्याचा आव आणतात; पण ऊस राज्याबाहेर नेण्यास बंदी केल्यानंतर रोहित पवार यांनी आंदोलन का केले नाही? मी त्यांना खुले आव्हान देतो की, दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतर काढायला रोहित पवार यांनी आंदोलन केले, तर आम्हीदेखील आंदोलनात सहभागी होऊ," असे सदाभाऊ खोत म्हणाले.

"देशपातळीवर साखरेच्या किमती वाढत आहेत. अशात काही साखर कारखानदार यांनी साखर महासंघमार्फत सरकारला झोनबंदी करण्याबाबत विनंती केली होती. सरकारने देखील हे मान्य करून झोनबंदी जाहीर केली. त्याला राज्यभरातून विरोध झाला. यानंतर शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष पाहायला मिळाला. त्यानंतर रात्री अधिसूचना रद्द करण्याचा जीआर काढण्यात आला. सरकारचे या बद्दल अभिनंदन करतो," असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला.

Sadabhau Khot
India Vs Canada : भारत - कॅनडामध्ये तणाव ? केंद्र सरकारने जारी केली अ‍ॅडव्हायझरी; कॅनडातील भारतीयांसाठी महत्त्वाच्या सूचना

सरकारने राबणाऱ्या माणसाकडून बघून चालवे. लुटारूचे ऐकून पाहून निर्णय घेवू नये, असे सदाभाऊ म्हणाले.

"घटकपक्ष हे साखर कारखानदार याच्याशी संबंधित नाहीत. वसंतदादा साखरसंघ हा साखर सम्राटाचा संघ आहे. संघ बडेमिया याच्या ताब्यात आहे. सहकार मंत्र्यांना वाटलं आपले भाऊबंद अडचणीत येतील, म्हणून त्यांनी अशा प्रकरचा निर्णय घेतला होता, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com