Ranjitsinh Nimbalkar : साहेब, आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही, तर.... : रणजितसिंह निंबाळकरांनी फडणवीसांसमोर मन मोकळे केले

Phaltan Political News : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये बदल घडविण्याचा निर्धार व्यक्त केला असून विरोधकांविषयी वैर न ठेवता सौहार्द राखण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे.
Ranjeetsinh Naik Nimbalkar
Ranjeetsinh Naik NimbalkarSarkarnama
Published on
Updated on
  1. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणच्या जनतेचे आभार मानत ‘बदला नाही, बदल घडवायचा’ असा संदेश दिला आणि विरोधकांविषयी संयम बाळगण्याची आठवण कार्यकर्त्यांना करून दिली.

  2. त्यांनी सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फलटण शहरातून भाजपला ७६ आणि ७४ टक्के मतदान मिळाले असून हे शहराच्या भावनेचे प्रतीक आहे.

  3. निंबाळकर यांनी आपल्या सामाजिक आणि औद्योगिक योगदानाची आठवण करून देत जनतेची सेवा अखेरपर्यंत करण्याची शपथ घेतली.

Phaltan, 26 October : लोकसभा निवडणुकीत फलटण शहरातून मला ७६ टक्के, तर विधानसभेला आमदार सचिन पाटील यांना ७४ टक्के मतदान आहे, त्यामुळे शहराची भावना लक्षात येते. विरोधकांना केवळ २२ ते २४ टक्के मतदान आहे. पण मी ठरवलंय, साहेब आम्हाला कोणाचाही बदला घ्यायचा नाही, तर बदल घडवायचा आहे. विधानसभा निवडणूक जिंकली, त्यावेळी कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. आपले विरोधक रामराजे नाईक निंबाळकर असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील. एकाही कार्यकर्त्याने त्यांच्या दारात फटाके वाजवायचे नाहीत, त्यांच्या विरेाधात घोषणा द्यायच्या नाहीत किंवा त्यांच्या दारात जाऊन गुलाल उधळायचा नाही, अशी आठवण माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितली.

फलटण येथे कृतज्ञता सोहळा आणि विविध विकास कामांचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. त्या कार्यक्रमात बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मनातील भावना बोलून दाखवल्या.

निंबाळकर म्हणाले, कितीही वाईट प्रसंग आला, कितीही आरोप झाले तरी आम्ही संस्कृती पाळण्याचे काम करतो. दोन दिवसांपूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला. मृत्यूचे कारण तिने हातावर लिहिले हेाते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटणला येणार आहेत, म्हटल्यावर गलिच्छ राजकारण झाले. पण माझ्या फलटणच्या जनतेला माहिती आहे की रणजितसिंह निंबाळकर कधी चुकणार नाही.

Ranjeetsinh Naik Nimbalkar
Sachin Kalyanshetti : आमदार सचिन कल्याणशेट्टींची मोठी घोषणा; सोलापुरात भाजप झेडपी निवडणूक स्वबळावर लढणार अन्‌ सत्ता आणणार

वयाच्या सोळाव्या वर्षी घरातील एक रुपयाही न घेता घरातून बाहेर पडलो होतो. वयाच्या अठराव्या वर्षी दुधाचा प्रकल्प उभा केला. हजारो शेतकऱ्यांचे दुध संकलन केले, एकाही शेतकऱ्याचा रुपया बुडविला नाही. आता स्वराज कारखान्याच्या माध्यमातून काम करत आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक दर कारखाना सुरू झाल्यापासून देतोय, असेही निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

Ranjeetsinh Naik Nimbalkar
Jalgaon Police : चित्रपटात बघतो तसं रिअलमध्ये घडलं ! मग काय? चार पोलिसांना जागेवर केलं निलंबित..

मला माहिती नाही, कुठला मतदारसंघ राखीव होईल, भविष्यात संधी मिळेल ना मिळेल. मी खासदार असताना अनेक कामे एकाच वेळी आणली, असं मला सांगण्यात आले. त्यावर इन्स्टॉलमेंटमध्ये काम करायाची आपल्याला सवय नाही, असे निंबाळकर यांनी सांगत ‘मी उद्या राहील की नाही माहित नाही. पण, जीवात जीव असेपर्यंत जनतेची सेवा करत राहीन’ असेही त्यांनी नमूद केले

Q1. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना काय सांगितले?
त्यांनी विरोधकांविरुद्ध बदला न घेता बदल घडवण्याचा सल्ला दिला.

Q2. फलटण शहरातून भाजपला किती टक्के मतदान मिळाले?
लोकसभा निवडणुकीत ७६% आणि विधानसभा निवडणुकीत ७४% मतदान मिळाले.

Q3. निंबाळकर यांनी कोणत्या क्षेत्रात काम केले आहे?
ते दुग्ध व्यवसाय आणि स्वराज कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत.

Q4. निंबाळकर यांनी शेवटी कोणती भावना व्यक्त केली?
ते म्हणाले की, जीवात जीव असेपर्यंत ते जनतेची सेवा करत राहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com