Sachin Kalyanshetti : आमदार सचिन कल्याणशेट्टींची मोठी घोषणा; सोलापुरात भाजप झेडपी निवडणूक स्वबळावर लढणार अन्‌ सत्ता आणणार

Local Body Election BJP Big Announcement : सोलापूरचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा नारा दिला असून महायुतीतील इतर दोन पक्षांची प्रतिक्रिया काय, याकडे लक्ष लागले आहे.
Sachin Kalyanshetti
Sachin Kalyanshetti Sarkarnama
Published on
Updated on
  1. सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा जोर वाढला असून भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिला आहे.

  2. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि काँग्रेसचा एक माजी आमदार भाजपमध्ये आणला, ज्यामुळे महायुतीतील तणाव वाढला आहे.

  3. कल्याणशेट्टी यांनी विश्वास व्यक्त केला की भाजप सोलापूर जिल्हा परिषदेवर स्वबळावर सत्ता आणणार, आणि यासाठी पक्षाची पूर्ण तयारी सुरू आहे.

Solapur, 26 October : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता जोरजोरात वाजू लागले आहेत. राज्यात सत्तेवर असलेली महायुती निवडणुकीसाठी जोरात कामाला लागली आहे. मात्र, सत्तेतील तीनही पक्ष महायुती म्हणून लढणार की स्वबळावर निवडणूक लढविणार, याबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता असतानाच सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वबळाचा नारा दिला आहे, त्यामुळे महायुतीमधील इतर दोन पक्षांची प्रतिक्रिया काय असणार, याकडे राजकीय वर्तुळाची अपेक्षा आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेषतः फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. महायुतीमध्येच ही फोडाफोडा सुरू झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या अर्थाने त्याची खमंग चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन, तर काँग्रेसच्या एका माजी आमदाराला भाजपने गळाला लावले आहे. यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन माजी आमदार फोडल्याने पक्षाच्या प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. तसेच, राष्ट्रवादीच्या तीन माजी आमदारांच्या भाजप (BJP) प्रवेशाला हरकत घेतल्याची माहिती आहे, त्यामुळे येत्या सोमवारी (ता. २७ ऑक्टोबर) होणारा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे तीन, तर काँग्रेसचा एक माजी आमदार गळाला लावला आहे. तसेच सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासाठीही ग्रीन सिग्नल दाखवला आहे. त्यामुळे भाजपची वाटचाल ही स्वबळाकडे जात असल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत होते.

Sachin Kalyanshetti
Baliram Sathe : राजन पाटलांच्या बालेकिल्ल्यातून बळीराम साठेंनी फुंकले जिल्हा परिषद निवडणुकीचे रणशिंग

त्यात आता खुद्द भाजपचे बडे नेते तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक आम्ही पहिल्यांदा स्वबळावर लढवून जिंकू, अशी आम्हाला खात्री आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आम्ही ताकदीने लढवत आहोत.

सध्याच्या राजकीय घडामोडी तुम्हालाही कळत असतील. आम्ही जिल्हा परिषदेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर स्वबळावर लढवून सत्ता आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ती सत्ता आम्ही सोलापूर जिल्ह्यात स्वबळावर निश्चितपणे आणू, असा विश्वासही आमदार कल्याणशेट्टी यांनी बोलून दाखवला.

Sachin Kalyanshetti
NCP SP Politic's : थेट नगराध्यक्षपदासाठी मंगळेवढ्यात सहाजण फुंकणार तुतारी; ‘ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना उमेदवारी देऊ नका’

Q1. सोलापूर जिल्ह्यात कोणत्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली?
भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली.

Q2. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोणती राजकीय हालचाल केली?
त्यांनी राष्ट्रवादीचे तीन आणि काँग्रेसचा एक माजी आमदार भाजपमध्ये आणला.

Q3. या हालचालीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया काय होती?
अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आणि प्रवेश कार्यक्रम लांबणीवर टाकला.

Q4. आमदार कल्याणशेट्टी यांचा निवडणुकीबाबत काय विश्वास आहे?
ते म्हणाले की सोलापूर जिल्हा परिषद भाजप स्वबळावर जिंकणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com