Bharat Jodo Yatra : साहिलने साधला राहुल गांधीशी संवाद; दिली उंडाळकर काकांची माहिती...

राहूल गांधी Rahul Gandhi यांनी साहिलला Sahil जवळुन बोलावुन घेवुन त्याच्या हातात हात घालुन त्याच्याशी संवाद साधला.
Sahil Patil with Rahul Gandhi
Sahil Patil with Rahul Gandhisarkarnama
Published on
Updated on

कऱ्हाड : भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी सर्वसामान्यांना जवळ घेवुन चर्चा करतात हे चित्र पहायला मिळत आहे. त्याअंतर्गत श्री. गांधी यांनी उंडाळे येथील साहिल संजय पाटील या तरुणाला जवळ बोलावुन त्याच्या हातात हात घालुन त्याच्याशी संवाद साधला. साहिलनेही सलग ३५ वर्षे आमदार असलेल्या विलासकाका-पाटील उंडाळकरांच्या उंडाळे गावचा असुन काकांनी केलेली विकास कामे सांगुन राहुल गांधीचे लक्ष वेधले.

काँग्रेसच्यावतीने राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. ही यात्रा सध्या महाराष्ट्रातून जात आहे. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी कराड तालुक्यातील उंडाळे येथील साहिल पाटील हा नांदेडला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत गेला होता. त्या यात्रेमध्ये चालत असताना त्याला राहुल गांधी यांना जवळुन भेटण्याची संधी मिळाली.

गांधी यांनी साहिलला जवळुन बोलावुन घेवुन त्याच्या हातात हात घालुन त्याच्याशी संवाद साधला. त्याबाबत माहिती देताना साहिल म्हणाला, मला राहुल गांधी यांनी मला माझे नाव, गावाचे नाव विचारले. त्यावेळी मी त्यांना सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड दक्षिण मतदार संघाचे लोकनेते विलासकाका पाटील - उंडाळकर यांच्या उंडाळे गावचा आहे.

Sahil Patil with Rahul Gandhi
Marathwada : `भारत जोडो`सोबतच काँग्रेस जोडो देखील व्हायला हवे..

काकांनी सलग 35 वर्षे आमदार म्हणुन काम करत असताना वाडीवस्तीपर्यंत दळणवळणाचे मुख्य साधन असलेले रस्ते, पाणी, आरोग्य सेवा पोहचवल्या, असे सांगीतले. त्यानंतर गांधी यांनी तुझे शिक्षण काय झाले, काय शिकतोय, सध्या काय करतोस असे विचारले. त्यावर मी एका फेव्हिकॉलच्या कंपनीचा डिस्ट्रीब्युटरशी घेतली असल्याचे सांगितले.

Sahil Patil with Rahul Gandhi
Sangali : देशाच्या विभाजनाचा मोदी सरकारचा डाव : पृथ्वीराज चव्हाण

त्यानंतर गांधी यांनी मला आणखी एक-दोन फेव्हीकॉलच्या कंपन्यांन्यांची नावे सांगुन संबंधित कंपन्यांचा फेव्हिकॉल चांगला चालतो. मग तुझीच कंपनी कशी चांगली आहे, अशी विचारणा केली. त्यावर मी त्यांना आपण जे काम करतो, जे प्रोडक्ट विकतो ते चांगलेच आहे, अशी आपल्या मनाची खात्री असली की ते प्रोडक्ट चांगलेच आहे म्हणुन त्याचा प्रसार होतो, असे उत्तर दिले. ते उत्तर त्यांना खुपच आवडेल. त्यानंतर त्यांनी माझ्याकडुन इतरही काही माहिती घेतली.

Sahil Patil with Rahul Gandhi
Bharat Jodo : हजारोंच्या गर्दीतही राहूल गांधींचे लक्ष `त्या` चिमुकलीकडे गेलेच..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com