Sajan Pachpute News: साजन पाचपुते ठाकरेशाही सोबत जाणार; पक्षाची मोठी जबाबदारीही मिळणार

Sajan Pachpute Join Thackeray Group: साजन पाचपुते हे भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत
Sajan Pachpute join Thackeray Group :
Sajan Pachpute join Thackeray Group : Sarkarnama
Published on
Updated on

Shrigonde News : श्रीगोंदे (नगर) काष्टीचे सरपंच व भाजपाचे दिवंगत नेते सदाशिव पाचपुते यांचे पुत्र साजन पाचपुते हे लवकरच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनीच ही माहिती दिली. पाचपुते यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी सोपविली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

साजन पाचपुते हे भाजपाचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत साजन विरुध्द प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली आणि साजन यांनी बहुमताने विजय मिळविला. त्यावेळी कुटुंबात वादाची ठिणगी पडली. मध्यंतरी साजन पाचपुते यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकलीही होती.

Sajan Pachpute join Thackeray Group :
Bhandara-Gondia Politics: निवडणुकीपूर्वीच तापले वातावरण; नातवाच्या हाताने पुतण्याचा काटा काढण्याचा काकांचा डाव?

काष्टी हे तालुक्यातील मोठे गाव तेथील सरपंच व बाजार समितीचे संचालक ही पदे असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते. त्यांचे व ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे घनिष्ठ संबंध आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची साजन पाचपुते यांनी भेट घेतली. त्यावेळी साजन हे ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती खुद्द साजन पाचपुते यांनीच दिली. साजन पाचपुते यांचा लवकरच प्रवेश होणार असून त्यांच्याकडे पक्षाची मोठी जबाबदारी मिळणार असल्याचेही समजते.

Sajan Pachpute join Thackeray Group :
Onion Issue News : विरोधकांना नाक राहिले नाही..; अनिल बोंडेंचा शरद पवारांवर निशाणा ; व्यापाऱ्यांसाठी गळे काढण्याचे...

दरम्यान, आज शिर्डी लोकसभेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपल्या काही समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला. आज (२३ ऑगस्ट) हा शिवबंधन सोहळा दुपारी १२ वाजता मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या हाती शिवबंधन बांधले. प्रशासकीय सेवेतून राजकारणात आलेल्या भाऊसाहेब वाकचौरेंनी 2009 साली खासदार झाले.

वाकचौरेंनी तत्कालीन दिग्गज उमेदवार रामदास आठवले यांचा पराभव करत केला. त्यानंतर त्यानंतरही त्यांनी काँग्रेस आणि भाजप मध्येही राजकीय प्रवास केला. त्यानंतर आज वाकचौरेंनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com