Sajan Pachpute Join Thackeray Group : साजन पाचपुते आज ठाकरे गटात प्रवेश करणार

BJP-Thackeray Politics : बबनराव पाचपुते यांचे भाऊ सदाअण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडली.
Sajan Pachpute Join Thackeray Group :
Sajan Pachpute Join Thackeray Group : Sarkarnama

Nagar Political News : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते हे आज ठाकरे गटात आज प्रवेश करणार आहेत. सायंकाळी पाच वाजता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या निवासस्थानी साजन पाचपते यांचा पक्षप्रवेश होईल. साजन पाचपुते यांना ठाकरे गटात मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात काका विरुद्ध पुतण्या अशी राजकीय लढत पाहायला मिळू शकते.

बबनराव पाचपुते यांचे भाऊ सदाअण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडली. त्याचा फटका आमदार पाचपुतेंना सरपंच पदाच्या निवडणुकीतही बसला. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंचपदाच्या निवडणूकीत साजन पाचपुते विरुध्द प्रतापसिंह पाचपुते अशी लढत झाली आणि साजन यांनी बहुमताने विजय मिळविला. त्यावेळी पाचपुते कुटुंबात वादाची ठिणगी पडली.

Sajan Pachpute Join Thackeray Group :
Sajan Pachpute News: साजन पाचपुते ठाकरेशाही सोबत जाणार; पक्षाची मोठी जबाबदारीही मिळणार

मधल्या काळात साजन पाचपुतेंनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुध्द लढवून जिंकलीही होती. साजन पाचपुते काष्टी तालुक्यातील सरपंच व बाजार समितीचे संचालक ही पदे असतानाही राजकीयदृष्ट्या साजन पाचपुते कुठल्याही पक्षात नव्हते.

पण, साजन पाचपुते आणि खासदार संजय राऊत यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मागील महिन्यात मुंबईत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची साजन पाचपुतेंनी भेट घेतली. त्यावेळी साजन हे ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती होती.

Sajan Pachpute Join Thackeray Group :
Ajit Pawar News : सलग तिसऱ्या दिवशी अजित पवारांचे कार्यक्रम राखीव; काय आहे कारण?

खासदार संजय राऊत यांनीदेखील ट्विट करत पाचपुते यांच्या प्रवेशाची घोषणा केली आहे. "नगर जिल्ह्यातल्या राजकारणातील आणखी एक पॉवर फुल पुतण्या आज शिवसेनेत! साजन पाचपुते आज वाजत गाजत शिवसेनत प्रवेश करणार!" असं ट्विट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही काही दिवसांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर आज नगर जिल्ह्यातल्या राजकारणातील आणखी एक पुतण्या आज शिवबंधन हाती बांधणार आहे. त्यामुळे हळुहळु ठाकरे गटाचीही ताकद वाढत चालल्याचे दिसत आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com