Kagal Politics : कागलमध्ये घाटगे-मंडलिक एकत्र : समरजितसिंहांनी हसन मुश्रीफांना दिला हा इशारा

त्यांना एकवेळ किरीट सोमय्या परवडेल; पण, मी परवडणार नाही
Samarjitsingh Ghatge
Samarjitsingh GhatgeSarkarnama
Published on
Updated on

मुरगूड (जि. कोल्हापूर) : मला डिवचण्याचा प्रयत्न करु नका, असा इशारा मी यापूर्वीच आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना दिला होता. तरीही त्यांनी मला डिवचलेच, त्यामुळे आता त्यांना एकवेळ किरीट सोमय्या परवडेल; पण, मी परवडणार नाही, असा इशारा समरजितसिंह घाटगे यांनी दिला. (Samarjitsingh Ghatge's warning to Hasan Mushrif)

कागल तालुक्यातील शिंदेवाडी येथील जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मंजूर १ कोटी ६७ लाखांच्या नळपाणी पुरवठा योजनेचा प्रारंभ समरजितसिंह घाटगे व ॲड. वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कागलमध्ये मंडलिक गट आणि घाटगे एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही गट यापुढेही एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Samarjitsingh Ghatge
Karnataka Election : शरद पवारांचा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कानमंत्र : निवडणुकीत राष्ट्रवादी देणार पाठिंबा

समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘संताजी सहाकरी साखर कारखान्याबद्दल तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांची साखर बंद करण्याची धमकी मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांमार्फत देण्यात येत आहे. मी त्यांना खुले आव्हान देतो की त्यांनी शेतकऱ्यांची साखर बंद करून दाखवावीच.’

Samarjitsingh Ghatge
Jayant Patil News : ही लढाई एकतर्फी नाही : निवडणुकीबाबत जयंत पाटलांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा

ॲड. वीरेंद्र मंडलिक म्हणाले, ‘राजकीय वाटचालीत मी सुरुवातीला अमरिश घाटगे यांच्याशी मित्रत्व केले. पण, त्यांनी नेहमी शत्रुत्वच पाहिले. मी नेहमीच मित्रत्वाचा हात पुढे करतो. समरजितराजेंच्या रूपाने मला थोरला भाऊ मिळाला आहे. राजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.’

Samarjitsingh Ghatge
Sambhaji Raje On Sawant : मग्रूर, निर्ढावलेल्या तानाजी सावंतांचा राजीनामा घ्या; अन्यथा.... : संभाजीराजेंचा सरकारला इशारा

या वेळी सत्यजित पाटील, संजय पाटील आदींची भाषणे झाली. जयवंत पाटील, सुहास खराडे, जयसिंग भोसले, दीपक शिंदे, दगडू शेणवी, रामचंद्र खराडे, रवींद्र ढेरे, मनोहर आवटी, अरविंद शिंदे, पांडुरंग खराडे, नारायण मुसळे, उपसरपंच रामेश्वरी खराडे उपस्थित होते. दत्तामामा खराडे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. अजित मोरबाळे यांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com