Sambhaji Raje On Sawant : मग्रूर, निर्ढावलेल्या तानाजी सावंतांचा राजीनामा घ्या; अन्यथा.... : संभाजीराजेंचा सरकारला इशारा

त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरीदेखील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
Tanaji Sawant-Sambhaji Raje
Tanaji Sawant-Sambhaji RajeSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ‘‘निर्ढावलेले, संवेदनाहीन व मग्रूर आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा; अन्यथा स्वराज्य यामध्ये उतरेल,’’ अशा शब्दांत संभाजीराजे (Sambhaji Raje) छत्रपती यांनी इशारा दिला आहे. (Resign Health Minister Tanaji Sawant; Otherwise.... : Sambhaji Raje's warning)

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे स्वत:च्या भूम-परांडा मतदारसंघातील ग्रामीण आरोग्य केंद्राची सुव्यवस्था ठेवू शकत नाहीत. त्यांचा भोंगळ कारभार मी स्वतः उघडकीस आणून एक महिना झाला तरीदेखील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. इतके हे मंत्री महोदय निर्ढावलेले आहेत, असा हल्लाबोलही संभाजीराजे यांनी सावंत यांच्यावर केला.

Tanaji Sawant-Sambhaji Raje
Theft in Umesh Patil's Bungalow: राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या बंगल्यात चोरी

काही दिवसांपूर्वी माजी खासदार संभाजीराजे यांनी भूम परांड्याचा दौरा केला हेाता. त्यावेळी त्यांनी आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली होती. खुद्द आरोग्य मंत्र्यांच्या मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा आणि रुग्णालयांची दुरवस्था संभाजीराजे यांनी सर्वांसमोर आणली होती. भूम शासकीय रुग्णालयात डॉक्टर व नर्सची कमतरता असल्याचे पुढे आले होते. रुग्णालयातील अनेक उपकरणे बंद पाहून संभाजीराजे हे चांगलेच संतापले होते.

Tanaji Sawant-Sambhaji Raje
Ramesh Baraskar News: राष्ट्रवादी नेत्याच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न; मोहोळमध्ये खळबळ

आम्ही काहीही सहन करू. पण आरोग्य विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था सहन करणार नाही. मी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे संभाजीराजे यांनी म्हटले होते. आरोग्याचे विषय गांभीर्याने घ्या; अन्यथा मी बघून घेईन, असाही इशारा संभाजीराजेंनी दिला होता.

Tanaji Sawant-Sambhaji Raje
Nashik APMC News : राष्ट्रवादीच्या स्वतंत्र मोर्चेबांधणीने महाविकास आघाडीबाबत संभ्रम!

इशारा देऊनही सुधारणा न झाल्याने संभाजीराजेंनी आरोग्य मंत्र्यांच्या मतदार संघांतील रुग्णालयातील व्हिडिओ ट्विट करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नवी मुंबईत दोन दिवसांपूर्वी झालेल्या जाहीर सभेत, संभाजीराजे यांनी हाच व्हिडिओ लावला होता. स्वराज्य संघटना जनतेचे प्रश्न घेऊन राजकीय वातावरण तापवणार आहे, असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com