Sambhaji Brigade : शिवसेना ठाकरे गट-संभाजी ब्रिगेडमध्ये मंचावरच झाले मतभेद!

Sambhaji Brigade : य़ुतीतील दोन पक्ष सावरकरांच्या मुद्द्यावर आमने - सामने!
Sambhaji Brigade Uddhav Thackeray
Sambhaji Brigade Uddhav ThackeraySarkarnama

नाशिक : शिवसेनेतल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटान विविध राजकीय प्रवाहांना आपल्यासोबत घेतले आहेत. यामध्ये सर्वात आधी संभाजी ब्रिगेडसोबत शिवसेना ठाकरे गटाने युती जाहीर केली. यानंतर डाव्या पक्षांच्या नेत्यांनीही उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली. वंचित बहुजन आघाडीसोबत आता युतीची घोषणाही करण्यात आली. मात्र विविध विचारसरणीला सामावून घेताना ठाकरे गटाची अडचणही होताना दिसत आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेडमधील मतभेद समोर आले आहेत.

Sambhaji Brigade Uddhav Thackeray
Shocking: एसपी सचिन पाटील, मनसे नेते प्रदीप पवार यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदिनानिमित्त आयाजित मेळ्याव्यात सावरकरांच्या मुद्द्यावरून मतभेद दिसून आले. मेळाव्यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आपल्या भाषणात सावरकरांवर टिका केली. सावरकरांवर टिका करतान त्यांनी बाबासाहेब आंबेडरकरांच्या एका भाषणाचा दाखलाही त्यांनी दिला. त्यांच्या याच विधानावर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. तुमची आमची युती असली तरी बोलताना भान ठेवा, अशा शब्दात जाधवांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्यांना सुनावले.

Sambhaji Brigade Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या 'या' विधानामुळे चर्चांना उधाण ; 'योग्यवेळी निर्णय घेणार..'

यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची नव्याने युती झाली असली तरी त्यांच्यातले जुने मतभेद, वैचारिक प्रवाह जुनेच कायम आहेत. यामुळे नव्या युतीच्या मार्गामध्ये जुनेच दुखणे खोडा घालत असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे आता यापुढेही सावरकरांच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांकडून कसा समतोल साधला जातो, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com