संभाजीराजे आक्रमक: मराठा समाजाने लाँगमार्चच्या तयारी करावी

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या या प्रश्नावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर टोलवा टोलवी करत आहे.
Chhatrapati Sambhajiraje
Chhatrapati Sambhajirajesakal Reporter
Published on
Updated on

सातारा : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांवर सरकार दुर्लक्ष करीत अस्याने या सरकारला जागे करण्यासाठी आता मराठा समाजाने पुणे ते मुंबई लाँग मार्च काढण्याची तयारी करावी, अशी उद्‌घोषणा छत्रपती संभाजीराजे यांनी रायगड जिल्ह्यातील वावोशी फाटा येथील सभेत केली.

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या या प्रश्नावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर टोलवा टोलवी करत आहे. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर नाराज असलेले खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारवर टीका करत आता मराठा आरक्षणप्रश्नी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षणासा सध्या रायगड जिल्ह्यातून त्यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली आहे. यावेळी वावोशी फाटा येथील सभेला संबोधित करताना त्यांनी मराठा समाजाने लाँग मार्चच्या तयारीला लागावे, असे आवाहन केले आहे.

Chhatrapati Sambhajiraje
मराठा आरक्षण अशोक चव्हाण यांच्यामुळे नाही, तर केंद्र सरकारमुळे गेलं

संभाजीराजेंच्या राज्यव्यापी दौरा २५ ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी पाळत नसल्याचे सांगत सरकारला आम्ही अल्टिमेटमही दिलं होतं. मात्र, सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. आता चर्चेला जागा नाही, असे सांगत त्यांनी पुन्हा राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले होते. कोरोना संकटाच्या काळात त्यांनी मराठा समाजाला संयम ठेवण्याचे आवाहन केले होते. पण आता सरकार केवळ विविध कारणे पुढे करत वेळकाढूपणा करत आहे. सरकारच्या या उदासिन भूमिकेवर त्यांनी हल्लाबोल केला आहे.

Chhatrapati Sambhajiraje
बोट चालवत खासदार उदयनराजे मंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला...

मागील काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी आरक्षण प्रश्नी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. अनेक दशके आर्थिक दारिद्र्यात असलेला मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रास मागास आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण मिळणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com