महाराज...तुमच्या नजरेतलं 'स्वराज्य' घडवायचंय! संभाजीराजेंची पोस्ट व्हायरल

संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी हाती शिवबंधन बांधण्यास नकार दिला आहे.
Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News
Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi NewsSarkarnama
Published on
Updated on

Sambhajiraje Chhatrapati latest news update

मुंबई : संभाजीराजे छत्रपतींनी राज्यसभेची (Rajya Sabha) निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने (Shiv Sena) दिलेला उमेदवारीचा प्रस्ताव स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला आहे. त्यानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. तर संभाजीराजे यांनी गुरूवारी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

शिवसेनेकडून कोल्हापूर येथील संजय पवार यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यानंतर संभाजीराजे यांनी गुरूवारी फेसबुक व ट्विटरवर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झालेला त्यांचे छायाचित्र आहे. (Sambhajiraje Chhatrapati Facbook Post Viral)

Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News
मुंबईत शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपला धक्का : अजितदादांच्या उपस्थितीत बांधले घड्याळ

या पोस्टमध्ये संभाजीराजे म्हणतात की, 'महाराज... तुमच्या नजरेतलं 'स्वराज्य' मला घडवायचंय...मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी... मी बांधील असेन तो फक्त जनतेशी...' या तीन ओळींमध्ये त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यावर ठाम असल्याचे सांगितले जात आहे.

संभाजीराजे यांची ही फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. तासाभरातच 10 हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली असून जवळपास 500 हून अधिक कमेंट आल्या आहेत. तसेच 200 जणांनी ही पोस्ट शेअर केली आहे. ट्विटरवरही ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

आता लक्ष २०२४!

दरम्यान, शिवसेनेच्या भूमिकेमुळे संभाजीराजेंची कोंडी झाल्याचं दिसत आहे. तर दुसरीकडे संभाजीराजेंच्या समर्थकांनीही हा मुद्दा लावून धरला आहे. संभाजीराजे समर्थक आक्रमक झाले असून आता सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल केली जात आहे. ''संभाजीराजे आता केवळ राज्यसभाच नाही तर संपूर्ण राज्यच घेणार. इतिहासाची पुनरावृत्ती होणार, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती, लक्ष २०२४" असा मजकूर छापण्यात आला आहे. यामुळे संभाजीराजे पुढे कोणती भूमिका घेणार,ते अपक्ष लढण्याच्या निर्णयावर ते ठाम राहणार का? त्यांची पुढची रणनीती काय असेल, अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com